राजन तेली यांचा राजीनामा चंद्रकांतदादांनी फेटाळला, तेलींवर विश्वास व्यक्त करत राजकीय वाटचालीसाठीही शुभेच्छा

| Updated on: Jan 04, 2022 | 5:12 PM

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि विशेष करुन शिवसेनेला मोठा धक्का बसला. मात्र, निवडणुकीत राजन तेली यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर तेली यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत, पुढेही पक्षासाठी काम करत राहणार असल्याचं सांगितलं होतं.

राजन तेली यांचा राजीनामा चंद्रकांतदादांनी फेटाळला, तेलींवर विश्वास व्यक्त करत राजकीय वाटचालीसाठीही शुभेच्छा
राजन तेली, चंद्रकांत पाटील
Follow us on

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) यांच्या नेतृत्वात भाजपनं दणदणीत विजय मिळवला. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि विशेष करुन शिवसेनेला मोठा धक्का बसला. मात्र, निवडणुकीत राजन तेली यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर तेली यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत, पुढेही पक्षासाठी काम करत राहणार असल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान, राजन तेली यांचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेटाळून लावला आहे. पाटील यांनी तेलींना पत्र लिहून तुम्हा राजीनामा अस्वीकारार्ह असल्याचं सांगितलं आहे. तसंच आपल्या नेतृत्वात स्थानिक संस्था, सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये भरीव यश प्राप्त झाले. तसेच संघटनात्मक वाढही झाली आहे. त्यामुळे भविष्यातही आपल्या नेतृत्वात निवडणुका लढवून त्यात भरघोस यश प्राप्त होईल, असा आम्हाला विश्वास आहे. आपल्या आगामी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा, असं चंद्रकांत पाटील पत्रात म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी राजन तेली यांचा राजीनामा फेटाळला

फडणवीसांकडून राजन तेलींचं कौतुक आणि सल्ला

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या विजयात राजन तेली यांचीही मोठी मेहनत होती. त्यांचा पराभव झाला असेल. मात्र, त्यांनी खचून जायचं कारण नाही. कारण समोरच्या बाजूला जे प्रत्यक्ष अध्यक्ष होते त्यांचा पराभव झालाय. आम्ही राजन तेली यांना पुन्हा सल्ला देऊ की त्यांनी पुन्हा नव्या दमानं आणि जोमानं कामाला लागलं पाहिजे, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिला होता.

तेलींच्या राजीनाम्यावर राणे काय म्हणाले होते?

राजन तेली यांचा पराभव आणि त्यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत विचारलं असता, ‘गड आला की सिंह गेला यापेक्षा आम्ही असे राजकारणी आहोत की गड न जाऊ देता आम्ही सत्ता जिंकतो. आमची दिल्लीपर्यंत सत्ता आहे. त्यामुळे राजन तेलीची आम्ही वर्णी लावणार. आम्ही वाया जावू देणार नाही. आम्ही मविआच्या लोकांना जागा दाखवली आहे, असं सांगतानाच राजन तेलीचा राजीनामा वरिष्ठांकडे दिला आहे. तो निर्णय वरिष्ठ घेतील. जो निर्णय घेतली तो मान्य असेल. ही काय शिवसेना नाही’, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली होती.

इतर बातम्या :

रश्मी ठाकरे उत्तमप्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात, शिवसेना नेत्याच्या वक्तव्यानं पुन्हा चर्चेला उधाण

Coronavirus: तोपर्यंत लॉकडाऊनचा विचार नाही, राजेश टोपेंनी दिला मोठा दिलासा