सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळचा लोकार्पण सोहळा आज पार पडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत या विमानतळाचा लोकार्पण सोहळा होत आहे. याबाबत बोलताना भाजप आमदार नितेश राणे म्हणाले, “माझ्या वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतोय याचा अभिमान वाटतोय. कोकणातील जनतेला माहीत आहे की हे त्यांच्या दादानीच केलं आहे” आजचा क्षण आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री आले त्यांचं स्वागत अभिमानाने आम्ही करतोय, या कार्यक्रमाला गालबोट लागता कामा नये याची दक्षता आम्ही घेऊ, असं नितेश राणेंनी सांगितलं.
विमानतळाचं काम कोणी केलंय हे सांगायची गरज नाही. पहिला शिवसेनेच्या वैभव नाईकांनी विरोध केला आणि नंतर ब्लास्टिंगचा ठेका मिळवला. शिवसेनेचे अरविंद सावंत केंद्रात मंत्री होते मग त्यांनी का नाही परवानगी आणली? राणे साहेब केंद्रात मंत्री झाल्यानंतर त्यांनी अवघ्या 60 दिवसात परवानगी आणली, असं नितेश राणे म्हणाले.
बाळासाहेबांचा मुलगा आमच्या राणे साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी येतो हा बाळासाहेबांचा आम्हाला आशीर्वाद असल्यासारखा आहे. बाळासाहेब आज असते तर त्यांनी पाठीवर हात मारून सांगितलं असतं नारायण मला तुझा अभिमान आहे, अशी भावना नितेश राणे यांनी व्यक्त केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी या विमानतळासाठी फॉलोअप घेतला होता. त्यांना निमंत्रण देण्याएवढी माणुसकीही यांच्यात नाही. म्हणून त्यांनी आणि प्रवीण दरेकरांनी बहिष्कार घातला आहे. याबाबत अधिक राणे साहेब आज बोलतील, असंही नितेश राणे म्हणाले.
चिपी विमानतळ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं होतं, पण त्याला छोटं केला त्यासाठी सर्वस्वी उद्योगमंत्री सुभाष देसाई जबाबदार आहेत. विनायक राऊत यांनी त्यांच्या क्षमते एवढे बोलावं ते त्यांच्या तब्येतीसाठीही चांगलं आहे. मोदीं साहेबांमुळे ते दोनदा खासदार झाले आहेत. केंद्रात सत्ता असताना अरविंद सावंत मंत्री बनले पण विनायक राऊत यांना मंत्री बनविण्याचा उद्धव ठाकरे यांनी विचार केला नाही, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी अगोदर दोन तीन दिवस येऊन इथले प्रश्न सोडवले असते तर आम्हाला समाधान वाटले असते, असं नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनोखे गिफ्ट दिलं. देवगड पुरळ हुर्शी गावातील अनेक शिवसैनिकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. कणकवली येथील नारायण राणेंच्या निवासस्थानी हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. “व्हॅलनटाईनला उद्धव ठाकरे यांना असंच गिफ्ट दिलं होतं, आज ते आमच्या जिल्ह्यात येत आहेत, म्हणून हे गिफ्ट त्यांना समर्पित करत आहे. हे गिफ्टही त्यांना आवडेल” अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
केंद्रीय मंत्री नारायण राणे
सुभाष देसाई
दादा भुसे
प्रसाद लाड
निरंजन डावखरे
रवींद्र चव्हाण
आदिती तटकरे
अरविंद सावंत
विनायक राऊत
विनय नातू
प्रमोद जठार
सीताराम कुंटे
संजय पांडे
अवधूत तटकरे
भाई गिरकर
नितेश राणे
निलेश राणे
संबंधित बातम्या
उद्घाटनप्रसंगी कोणतंही राजकारण करणार नाही, नारायण राणे कार्यक्रमाआधीच बॅकफूटवर