शिवसैनिक आक्रमक; मातोश्रीबाहेर 50 खोके एकदम ओक्केच्या घोषणा

| Updated on: Oct 18, 2022 | 1:47 PM

मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. 50 खोके एकदम ओक्केच्या घोषणा शिवसैनिक देत आहेत.

शिवसैनिक आक्रमक; मातोश्रीबाहेर 50 खोके एकदम ओक्केच्या घोषणा
Follow us on

मुंबई : मातोश्रीबाहेर (Matoshree) शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. बुलडाण्यातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी शिवसैनिक मातोश्रीवर दाखल झाले आहेत. आज या शिवसैनिकांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक आहे. त्यापूर्वी बुलडाण्यातून मातोश्रीवर दाखल झालेल्या शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 50 खोके एकदम ओक्केच्या घोषणा या शिवसैनिकांकडून देण्यात आल्या. शिवसैनिक शिंदे गटाविरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

आज उद्धव ठाकरेंसोबत बैठक

आज बुलडाण्यातील शिवसैनिकांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक आहे. या बैठकीसाठी शिवसैनिक मातोश्रीवर दाखल झाले आहेत. मातोश्रीवर दाखल झाल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.  50 खोके एकदम ओक्के अशा घोषणा शिवसैनिकांकडून देण्यात आल्या. जूनमध्ये अनेक आमदार फुटले, जुलैमध्ये खासदार फुटले मात्र जिल्ह्यात शिवसैनिकांचं संघटनात्मक पातळीवर कार्य सुरू आहे. अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा होती. आज ही भेट होत असल्याची प्रतिक्रिया मातोश्रीवर आलेल्या शिवसैनिकांनी दिली.

हे सुद्धा वाचा

भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा ठाकरे गटात प्रवेश

आज बुलडाणा जिल्ह्यातील भाजप, राष्ट्रवादी आणि वंचित बहूजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यासाठी हे कार्यकर्ते मातोश्रीवर दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हे कार्यकर्ते हाती शिवबंध बांधणार आहेत. हा बुलडाणा भाजपसाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. एकीकडे ठाकरे गटातून बाहेर पडून पदाधिकारी, नगरसेवक हे भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करत आहेत. मात्र दुसरीकडे बुलडाण्यातील अनेक भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.