SMC Election 2022 Ward No 21 | एमआयएमचे आता कोणाला बळ? भाजपला की राष्ट्रवादीला देणार टक्कर?

| Updated on: Aug 06, 2022 | 6:07 PM

SMC Election 2022 Ward No 21 | वॉर्ड क्रमांक 21 मध्ये 2017 मधील सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएमने करिष्मा दाखवला आणि चारही जागा खात्यात जमा केल्या होत्या. यंदा भाजपची आक्रमकता पाहता काय स्थिती राहिल हे काळ ठरवेल.

SMC Election 2022 Ward No 21 | एमआयएमचे आता कोणाला बळ? भाजपला की राष्ट्रवादीला देणार टक्कर?
एमआयएमचा विजयी रथ कोण रोखणार?
Image Credit source: TV9marathi
Follow us on

SMC Election 2022 Ward No 21 | महाराष्ट्राच्या वस्त्रीनगरीत (Textile Park) पुन्हा एकदा निवडणुकीचा (Election) धुराळा उडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसीबाबतच्या निकालानंतर आता या निवडणुकीला रंगत चढणार आहे. दक्षिण महाराष्ट्रातील या शहराची खासा अशी ओळख आहे. वस्त्रनगरीसह विडी उद्योगाने येथेच उभारी घेतली होती. हातमागावरची अनेक वस्त्र कधीकाळी महाराष्ट्रासह जगभरात विक्री होत होती. बिडी उद्योगाने ही आता मान टाकली आहे. घोंगड्या, सोलापूर चादरी, सोलापूरी पंचे यांची आजही राज्यच नाही तर राज्याबाहेर चलती आहे. राजकारणात सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांच्या रुपाने सोलापूरकडे राज्याचे नेतृत्व चालून आले होते. कॉम्रेड नरसय्या आडम (Narsayya Aadam) यांच्या रुपाने मार्क्सवाद्यांचा हा कधीकाळी बालेकिल्ला राहिला. कामगारांचे शहर असल्याने कामगारांनी समाजवादापेक्षा मार्क्सवाद जवळ केला आणि मास्तरांनी संपूर्ण भारतात एक आदर्श घालून दिला. सोलापूरच्या राजकारणात देशमुख गट ही सक्रीय आहे. पश्चिम महाराष्ट्रात असून ही अनेक बाबतीत जिल्हा मागास आहे. सांस्कृतिक आणि कामगार चळवळीचे केंद्र असलेले सोलापूर भूवैकुंठ ही आहे. महाराष्ट्राचं अराध्य दैवत पांडुरंग, विठ्ठलाने भक्तीपंथाची मुहुर्तमेढ सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथेच रोवली. वारकऱ्यांच्या भागवतधर्माने वर्ण, जातीच्या भिंती गाडून टाकल्या. वारकऱ्यांनी समतेची पताका खाद्यांवर घेतली. आता तिथेच लोकशाहीचा उत्सव होत आहे.

सोलापूरच्या राजकारणात काँग्रेसची घट्ट पकड राहिली. तसे कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर निढळ ध्रुव तारा राहिले. त्यांच्या रुपाने माकपने राज्यातील एक जागा कायम ठेवली होती. त्यानंतर देशाच्या राजकारणात 2014 पासून भाजपचे आक्रमक स्वरुप दिसून आले. त्याचा परिणाम सर्वाधिक नगर आणि सोलापूर जिल्ह्यात प्रकर्षाने दिसून आला. 2017 मध्ये महानगर पालिकेत अमरावतीसारखीच भाजपने दांडगाई दाखवली आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून जागा जिंकल्या. यामध्ये माकप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांना आणखी एक धक्का बसला तो एमआयएमच्या दणक्यात झालेल्या प्रवेशाने. एमआयएमने नांदेड, औरंगाबाद, मालेगावनंतर सोलापूरमध्ये ठसठशीत एंट्री केली. महाविकास आघाडीत असताना भाजपासोबतच राष्ट्रवादीने आक्रमकपणे संघटन केल्याने यावेळी भाजपासमोर राष्ट्रवादीचे तगडे आव्हान राहणार आहे. 2017 मधील महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 21 मध्ये चार ही जागांवर एमआयएमने कब्जा केला होता.

 

पालिकेचा सोनेरी इतिहास

1 ऑगस्ट 1852 रोजी सोलापूर नगरपालिकेची स्थापना झाली होती. पुढे 1 मे 1964 मध्ये सोलापूर नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. शेवटचे नगराध्यक्ष पारसमल जोशीच पहिले महापौर झाले. जवळपास 57 वर्षांच्या इतिहासात सोलापूर महानगरपालिकेचे महापौर म्हणून 37 जणांना मान दिला. शेवटच्या महापौर या भाजपच्या श्रीकांचना यन्नम होत्या. 8 मार्च 2022 रोजी महापालिकेची मुदत संपली.

सोलापूर महानगर पालिकेतील वॉर्ड क्रमांक 21 मधील विजयी उमेदवार

21 अ एमआयएमचे इस्मैल तौफिक

21 ब एमआयएमचे इरफान तसलीम

21 क एमआयएमचे युनूस शेख

21 ड एमआयएमचे अझर हुंडेकरी

 

सोलापूर महानगर पालिकेतील वॉर्डनिहाय लोकसंख्या

सोलापूर महानगर पालिकेतंर्गत एकूण लोकसंख्या 2011 च्या जणगणनेनुसार, 9 लाख 51 हजार 558 इतकी आहे. त्यात एक लाख 38 हजार 78 इतके अनुसूचित जाती आणि 17,982 अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. या लोकसंख्येत आता वाढ झाली आहे. प्रभाग क्रमांक 21 मध्ये एकूण 26,216 लोकसंख्या आहे. त्यात 10,974 अनुसूचित जाती आणि 795 अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

सोलापूर महानगर पालिकेतील वॉर्ड संख्या

सोलापूर महानगर पालिकेत पूर्वी 26 प्रभाग होते. आता 38 आहेत. आता 37 प्रभागात तीन वॉर्ड आहेत. तर एकाच म्हणजे 38 क्रमांकाच्या प्रभागात दोन वॉर्ड आहेत. महापालिकेत एकूण 113 जागांसाठी मतदान होणार आहे.

वॉर्डनिहाय आरक्षण

सोलापूर महानगर पालिकेतील वॉर्ड क्रमांक 21 मधील आरक्षण

21 अ अनुसूचित जाती

21 ब सर्वसाधारण महिला

21 क सर्वसाधारण

सोलापूर महानगर पालिकेतील वॉर्ड क्रमांक 21 परिसर

सह्याद्री शॉपिंग सेंटर, कोनापूरे चाळ, संगमेश्वर कॉलेज, विद्या विहार सोसायटी, मोदी, सोलापूर सोसायटी, शासकीय नियोजन भवन, नरसिंह नगर, सोनी नगर, मोदी हुडको व परिसर.

कालावधी आरक्षण महापौर

2009-12 सर्वसाधारण आरिफ शेख
2012-14 ओबीसी महिला अलका राठोड
2014-17 अनुसूचित जाती महिला प्रा. सुशीला आबुटे
2017-19 सर्वसाधारण महिला शोभा बनशेट्टी

पक्ष उमेदवारविजयी
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
एमआयएम
अपक्ष
पक्ष उमेदवारविजयी
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
एमआयएम
अपक्ष
पक्ष उमेदवारविजयी
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
एमआयएम
अपक्ष