SMC Election 2022 : सोलापुरात काँग्रेससमोर भाजपचं कडवं आव्हान, शेवटचा वॉर्ड क्रमांक 38 कुणाचा?

| Updated on: Aug 07, 2022 | 4:55 PM

गेल्यावेळी केवळ 26 वॉर्ड होते तर यावेळी ही वॉर्डची संख्या तब्बल 38 वर पोहोचली आहे. त्यामुळे ही वॉर्डची वाढलेली संख्या लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी पालिकेसाठी आपले प्लॅन आखायला सुरुवात केलेली आहे.

SMC Election 2022 : सोलापुरात काँग्रेससमोर भाजपचं कडवं आव्हान, शेवटचा वॉर्ड क्रमांक 38 कुणाचा?
सोलापुरात काँग्रेससमोर भाजपचं कडवं आव्हान, शेवटा वॉर्ड क्रमांक 38 कुणाचा?
Image Credit source: tv9
Follow us on

सोलापूर : सोलापूर महापालिकेचे निवडणूक (Municipal Corporation Election 2022) आणि काँग्रेस विरुद्ध भाजप सामना रंगणार नाही असं होणारच नाही. कारण या ठिकाणी दोनच पक्ष एकमेकांचे मुख्य प्रतिस्पर्धी (SMC Election 2022) मानले जातात. भाजपकडे नेत्यांची मोठी फळी आहे. तर दुसरीकडून सुशील कुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचं तगडं काँग्रेस नेतृत्व आणि चार वेळा आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे यांचं नेतृत्व भाजपला आव्हान देताना दिसून येतंय. सोलापूर महानगरपालिका ही फक्त मराठी मतदारांच्या मतदानावरती अवलंबून नाही. तरी या ठिकाणी तुम्हाला कानडी, तेलगु, हिंदी तसेच काही प्रमाणात इंग्रजी भाषिक मतदार ही दिसून येतात. या सर्वांचा अभ्यास करून या ठिकाणचे राजकीय पक्ष पालिकेसाठी मैदानात उतरतात. गेल्यावेळी केवळ 26 वॉर्ड होते तर यावेळी ही वॉर्डची संख्या तब्बल 38 वर पोहोचली आहे. त्यामुळे ही वॉर्डची वाढलेली संख्या लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी पालिकेसाठी आपले प्लॅन आखायला सुरुवात केलेली आहे.

पक्षउमेदवार विजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
अपक्ष/ इतर

वॉर्डमधील आकडेवारी काय सांगते?

एकदा या वॉर्डच्या आकड्यांच्या खेळावर ती नजर टाकूया, सोलापूर महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 38 एकूण लोकसंख्या पाहिल्यास जवळपास 18473 मतदार यामध्ये आहेत. तसेच अनुसूचित जातीचे 3450 तर अनुसूचित जमातीचे 644 लोक या वार्डमध्ये आढळून येतात. या वॉर्डची आणखी एक खासियत म्हणजे इतर सर्व वॉर्ड मधून तीन नगरसेवक निवडून जाणार आहेत, तर या एकट्या वार्ड मधून केवळ दोन नगरसेवक निवडून जाणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी ही निवडणूक अतिशय चुरशीचे होणार आहे हे आत्तापासूनच स्पष्ट झालं आहे.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवेसना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

काँग्रेससाठी कमबॅकची संधी

केंद्रात आणि राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना सोलापूर वरती ही काँग्रेसची पकड चांगली होती. मात्र मोदी लाटेत सोलापूर वरची  काँग्रेसचे पकड सुटून गेली आणि महानगरपालिका तसेच सोलापूरच्या राजकारणातला एक मोठा भाग काँग्रेसच्या हातून निसटला. मात्र आता मोदी लाट ओसरल्याचे चित्र जवळपास सोलापुरात निर्माण होत आहे, त्यामुळे काँग्रेससाठी पुन्हा कमबॅक करण्याची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसला पुन्हा एकदा आपली ताकद आजमावता येणार आहे. त्याची तयारी काँग्रेसने आत्तापासूनच सुरू केली आहे. तसेच भाजपही यावेळी त्याच जोमाने मैदानात उतरणार आहे. भाजपनेही या निवडणुकीसाठी काही महिने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ही निवडणूक आणकी चुरशीची झाली आहे.