सोलापूर : माजी पर्यटनमंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज्य सरकारच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत. “महाविकास आघाडीच्या कामांना स्थगिती देणारं हे सरकार वैध आहे काय?”, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय. ते सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. तिथे ते माध्यमांशी बोलत होते. ” स्वतःच्या काही गोष्टी आहेत जसे आता नवी मुंबईमध्ये आम्ही तिरुपती बालाजीचं मंदिर आणलेलं अयोध्येसाठी आम्ही मागणी केलेली यूपी सरकारकडे की तिथे महाराष्ट्र भवन व्हावं महाराष्ट्रात 10 मंदिर जी प्राचीन आहे त्याला आपण फंड दिलेलं पुन्हा दुसरी धाव घेत होतो आणि एक ठिकाणी मंदिर विकास असेल किंवा धार्मिक स्थळ असतील तर हे असं स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणत असेल तर ह्याची नक्की काय परिस्थिती आहे? काय स्थगिती दिली आहे की पुढे नेतात काम हा पण विचार करणे गरजेचे आहे”, असं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणालेत.
“मी प्रामाणिकपणे सगळे लोकांना भेटतोय कुठेही राजकीय दौरा नाहीये हा लोकांसाठी लोकांचा प्रेम घेण्यासाठी मी दोरा काढलेला आहे आणि तसाच मी रात्रभर फिरत आहे लक्ष देखील देत नाही कारण एक बगल आपण महाराष्ट्रात आम्हाला म्हणजे शिवसेनेला असेल ठाकरे परिवाराला असेल एकटे पाडण्याचा कट हे सगळे 40 गद्दार करत होते एकट पाड्याला प्रयत्न पुरेपूर चाललेला आहे त्यांचा तरी देखील जी काही जनता मला भेटत ते लोक जे भेटत आणि सोबत ते सांभाळून घेतील या मला खात्री आता आता ह्यांचा खरंच चेहरा बाहेर येतोय कारण आपण बघितलं असेल गेलं एक महिना त्यांचं जे नाट्य चालेल की आमचं मनात उद्धव साहेबांबद्दल आदर आहे आदित्य बद्दल प्रेम आहे”, असंही आदित्य ठाकरे म्हणालेत.
“आदित्य मुलासारखा आहे ते असं आहे खरंच त्यांचे मनात विचार होते ते आता लोकांसमोर यायला लागलेले आहेत जे आत्तापर्यंत शिवसेना म्हणून स्वतःला म्हणत होते कारण त्यांना जी काही कारवाई होती ती टाळायची होती आता तुम्ही त्यांचे खरे चेहरे बघताय आणि गद्दारी झालेली आहे तो गद्दारा गद्दारच असतो हे सरकार हे कोसळणार आपण लिहून घ्या कारण आपण एक बघा आता कुठचाही राजकीय पक्ष खुश नाही गद्दारीच हे जे काही पॅटर्न आहे हे इतर राज्यांमध्ये जायला लागलं तर देशात असतील तर म्हणू शकते. आपण बघाल की हे जे काही 40 लोक आहेत आणि बारा खासदार आहेत ह्यांना जनतेसमोर जावंच लागणार आहे आणि जनता एक निकाल देईल तो जनता ठरवते त्याच्यावर काही बोलणार नाही”, असं म्हणत आदित्य यांनी शिंदेगटाला प्रत्त्युत्तर दिलंय.