सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

| Updated on: Mar 05, 2020 | 3:10 PM

खासदार जयसिदेश्वर शिवाचार्य यांच्यासह अक्कलकोट/उमरगा तहसील कार्यलयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आ MP Jay Siddeshwar Shivachrya booked

सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा
Follow us on

सोलापूर : सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय आणि आर्थिक लाभ मिळवण्याच्या उद्देश्याने सरकारची फसवणूक केल्याची फिर्याद शिवाचार्यांविरोधात करण्यात आली होती. (MP Jay Siddeshwar Shivachrya booked)

अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांनी शिवाचार्यांविरोधात फिर्याद दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूरच्या सदर बझार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 420, 467, 468, 471, 34 अन्वये जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यासह अक्कलकोट/उमरगा तहसील कार्यलयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधीच खासदारकी धोक्यात आली असताना शिवाचार्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

काय आहे प्रकरण?

जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला. सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना, बेडाजंगम जातीचा दाखला सादर केला होता. त्यानंतर जातपडताळणी समितीने खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याविरोधात अनुसूचित जाती जमातीसाठी असलेले लाभ घेतल्याच्या कारणावरुन अक्कलकोट आणि उमरगा तहसीलदारांना न्यायालयात फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले होते.

कोण आहेत डॉ. जयसिदेश्वर शिवाचार्य

  • डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे जंगम समाजातील बेडा जंगम समाजातील आहेत.
  • अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव या मठाचे मठाधीश आहेत.
  • सोलापुरातल्या शेळगी येथे मठात वास्तव्यास आहेत
  • त्यांनी उत्तरप्रदेशातील बनारस विद्यापीठातून पीएचीडी मिळवली आहे. त्यांचं हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे.
  • गुरुसिधमल्लेश्वर कल्याण केंद्राच्या माध्यमातून त्यांनी सोलापूर जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालये सुरु केले आहेत.
  • मागासवर्गीय विद्यांर्थ्यांसाठी वसतीगृहांची स्थापना केली आहे,
  • शेजारच्या कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये शिवाचार्यांचे भक्त आहेत.

 

MP Jay Siddeshwar Shivachrya booked