भाजप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्यांना धक्का, जातीचा दाखला रद्द, खासदारकी धोक्यात

| Updated on: Feb 24, 2020 | 12:24 PM

जात पडताळणीत समितीने खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचं म्हणत, त्यांचा जातीचा दाखला रद्द केला.

भाजप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्यांना धक्का, जातीचा दाखला रद्द, खासदारकी धोक्यात
Follow us on

सोलापूर :  सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराज (Solapur Mp Jay Siddheshwar Swami in trouble) अडचणीत आले आहेत. जात पडताळणीत समितीने खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचं म्हणत, त्यांचा जातीचा दाखला रद्द केला, असा दावा तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी केला. थोड्याच वेळात प्रमोद गायकवाड यांच्या हातात निकालाची प्रत मिळणार आहे. त्यांना अधिकाऱ्यांनी फोनवरुन जातीचा दाखला रद्द केल्याची माहिती दिली.  त्यामुळे सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. जयसिदेश्वर शिवाचार्य महास्वामींची खासदारकीच आता धोक्यात आली आहे. (Solapur Mp Jay Siddheshwar Swami in trouble)

खासदार जयसिदेश्वर महास्वामींच्या बेड जंगम जात प्रमाणपत्रावरील सुनावणी 15 फेब्रुवारीला पूर्ण झाली होती. या सुनावणीत खासदारांच्या वकिलामार्फत सादर करण्यात आलेले 12 अर्ज समितीने फेटाळून लावले होते. तर तक्रारदारांनी सादर केलेला साक्षीदार पडताळणीचा अर्जही समितीने फेटाळला होता. उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार डॉ . जयसिदेश्वर शिवाचार्यांनी सादर केलेला बेड जंगम जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांनी केली होती. त्या अर्जावर सुनावणी झाली असून अंतिम निर्णय पोष्टाने तक्रादारांना कळविण्यात येणार असल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं.

दरम्यान जात पडताळणी समितीने सांगूनही महास्वामींच्या ज्या मूळकागदपत्राबाबत तक्रादाराने आक्षेप घेतला होता, ती कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे महास्वामीजींची खासदारकी धोक्यात आली आहे.

सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ जयसिदेश्वर शिवाचार्य यांनी आपल्या उमेदवारी अर्जसोबत दाखल केलेल्या बेड जंगम अर्जावर प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कुंदकरे यांनी आक्षेप घेत खासदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जात पडताळणी समितीसमोर सुनावणीची प्रक्रिया पार पडली. 31 जानेवारी आणि एक फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत तक्रारदारांनी आक्षेप घेतलेल्या मूळ कागदपत्रे सादर करण्याचे आदेश समितीने दिले होते. मात्र 15 फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीत ती कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत, त्यामुळे खासदारांची खासदारकी धोक्यात आल्याचा दावा  तक्रारदारांनी केला होता.

तर इकडे डॉ . जयसिदेश्वर महास्वामींच्या जातीच्या दाखल्यासंर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करत असताना, मूळ कागदपत्रे जोडली आहेत, त्यामुळे जात पडताळणी समितीसमोर सादर करता आली नसल्याचं सांगत, दक्षता पथकाने नोंदवलेल्या अहवालावर आक्षेप घेत नवे पथक नियुक्त होऊन पुराव्याची पुनर पडताळणी करण्याची मागणी केली आहे.

दोघांनी आपल्या आपल्या बाजूने आपली बाजू मांडली असली तरी जात पडताळीनी समितीने आपला निकाल राखून ठेवला होता. याबाबतचा निकाल लवकरच तक्रादाराना पोष्टाने कळविण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता डॉ. जयसिदेश्वर शिवाचार्यांची खासदारकीच धोक्यात आली आहे.

सोलापूर लोकसभा निवडणूक

डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या दोघांनाही महास्वामींनी पराभवाची धूळ चारली होती. जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवत ते ‘जायंट किलर’ ठरले होते.

संबंधित बातम्या 

महाराष्ट्रातील भाजप नेत्यावर खासदारकी रद्द होण्याची टांगती तलवार