…तर काहीही अर्थ लावून पंकजा मुंडे यांना भाजपच्या बाहेर ढकलाल; जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य

| Updated on: Jun 03, 2023 | 3:22 PM

Jitendra Awhad on Pankaja Munde : गोपीनाथ मुंडे यांचं योगदान, पंकजा मुंडे यांची कारकीर्द अन् भाजप पक्ष; जितेंद्र आव्हाड काय म्हणाले? वाचा सविस्तर...

...तर काहीही अर्थ लावून पंकजा मुंडे यांना भाजपच्या बाहेर ढकलाल; जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य
Follow us on

सोलापूर : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. यावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा पंकजा मुंडे यांना त्यांचे वडील पंकू म्हणतं होते. त्यांनी जर काही बोललेलं असेल तुम्ही पत्रकार अर्थ लावून त्यांना भाजपबाहेर ढकलाल, असं काही करू नका. त्या भाजपमध्येच राहणार आहेत. त्यांचे वडील भाजपचे सेवक होते, त्यांचे मामा भाजपचे सेवक होते. भाजप मोठं करण्यात त्यांच्या वडिलांचा आणि मामाचा मोठा हात होता, असं आव्हाड म्हणाले.

कुणी कोणाची भेट घेण्याने काय होतं? सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे सोलापुरात मला भेटलं तर काय होणार? पंकजा यांनी मनातल्या वेदना व्यक्त केल्या तर काय चुकलं? राजकारण्यांनी व्यक्त होऊच नये असं कुठं म्हटलंय, असंही आव्हाड म्हणालेत.

गोपीनाथ मुंडे यांनी मला व्यक्तिगतरित्या काय म्हटलं होतं हे मला माहिती आहे. ते मी माझ्या मनात ठेवलं आहे. कुठल्याही नेत्याला एक व्यक्तिगतरित्या ह्रदय असतं. त्यांना काय वाईट वाटतं त्यांच्या मनातील वैश्यम काय होतं ते त्यांनी सांगितलं, असं आव्हाड म्हणालेत.

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असं ठरलं होतं की निवडणुकांच्या बाबतीत कोणीही बोलू नये. हा सर्वस्व अधिकार पवारसाहेब, उद्धव साहेब आणि सोनियाजी किंवा खर्गे यांच्याकडे द्यावा. जर सगळे बोलायला लागलं की शब्दला शब्द खेटला जातो. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की तीनही पक्षानी मिळून बेकायदेशीर सरकार आहे ते बाजूला करावं. म्हणून उगाच नेत्यांनी एकमेकांवर टीका करून कार्यकर्त्यांची मने दुखवू नयेत, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

प्रत्येकाची आपआपली स्टाईल आहे, त्यावर मी काही बोलणार नाही. मी असं कधी बोलतं नाही, बोलणार नाही. त्यांची त्यांची स्टाईल आहे. आमच्यावर पवारसाहेबांचे संस्कार आहेत. चुकीचं बोलणं प्रश्न येतं नाही. कारण भीती असते की दहाव्या मिनिटाला शरद पवार साहेबांचा फोन येईल, ही आदरयुक्त भीती आहे, असं आव्हाड म्हणालेत.