पुणे/ सोलापूर : महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार आजपासून महाराष्ट्रात आचारसंहिता लागू (model code of conduct) करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर राहुल जाधव यांनी सरकारी वाहन जमा केले आणि स्वत: रिक्षा चालवत (Mayor Rahul Jadhav Drive rickshaw) घर गाठले. इतकंच नव्हे तर सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी यांनीही रिक्षा (Mayor Shobha Banshetti) पकडतं घरी गेल्या.
आज (21 सप्टेंबर) तिसरा शनिवार सरकारी कार्यालय सुरु आहेत. त्यामुळे सर्व पदाधिकारी नियमित वेळेत कामकाजासाठी रुजू झाले आहेत. दरम्यान दुपारी 12 च्या सुमारास निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Poll Dates) तारखांची घोषणा केली. तसेच आजपासून (21 सप्टेंबर) सर्व महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. आचरसंहिता लागू झाल्यानतंर राजकीय पदाधिकाऱ्यांना सरकारी गाड्या वापरता येणार नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांनी स्वत:ची सरकारी गाडी जमा केली. त्यानंतर त्यांनी स्वत: रिक्षा (Mayor Rahul Jadhav Drive rickshaw) चालवत घर गाठले. दरम्यान राहुल जाधव हे दहावी झाल्यानंतर शेती परवडत नसल्याने यापूर्वी उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवत (Mayor Rahul Jadhav Drive rickshaw) होते. त्यानंतर ते राजकारणात सक्रीय झाले.
दरम्यान दुसरीकडे सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी (Mayor Shobha Banshetti) या दैनंदिन कामकाजासाठी पालिकेत आल्या होत्या. मात्र आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्यांना (Mayor Shobha Banshetti) पालिकेत सरकारी गाडी जमा करावी लागली. त्यानंतर त्यांनी रिक्षा पकडत घर गाठले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर
महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केेलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या आहेत. यासोबतच दोन्ही राज्यांत आदर्श आचारसंहिता 21 सप्टेंबरपासूनच लागू झाली आहे.
महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर धनत्रयोदशीच्या आदल्याच दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी, तर हरियाणामध्ये 1.28 कोटी मतदार आहेत. राज्यात 1.84 लाख ईव्हीएम मतदान प्रक्रियेत वापरली जातील. प्रत्येक ठिकाणी पाच व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाच्या तारखा