सोलापूर : (Election Commission) राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशाने वार्ड फेररचनेत बदल झाला असून आता वार्डाच्या संख्येतही वाढ झाली आहे. 2017 च्या निवडणुकांमध्ये (Solapur Municipal Corporation) सोलापूर महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाचे वर्चस्व राहिले होते. त्यानंतर राज्यातील राजकारणाची समिकरणे बदलली आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम आता स्थानिक पातळीवर काय होणार हे पहावे लागणार आहे. (BJP) भाजपाने गत निवडणुकीत एकतर्फी विजय खेचून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात एंन्ट्री केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीनेही येथे संघटनात्मक बदल केला असून यंदाच्या निवडणुकीत त्याचे काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे. प्रभाग क्रमांक 35 हा नव्याने नावारुपाला आला आहे, त्यामुळे या प्रभागात सर्वच पक्ष जोर लावणार असल्याने बाजी कोण मारणार हे पहावे लागणार आहे. सोलापूर महापालिकेत एकूण 113 जागा आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 16, अनुसूचित जमातीसाठी दोन आणि महिलांसाठी 48 जागा राखीव आहेत.सोलापूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत.
2017 च्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देत भाजपाने महापालिकेवर कमळ फुलवले होते. त्यामुळे हा पक्षही गल्ली बोळात पोहचलेला आहे. भाजपाचे कडवे आव्हान आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर राहणार आहे. जशी प्रभागाची रचना बदलली आहे त्याचप्रमाणे राज्यातले राजकारणही गेल्या पाच वर्षात बदलले गेले आहे. त्याचा फायदा नेमका कुणाला होणार हे अवघ्या काही दिवसांमध्येच समोर येणार आहे. सोलापूरची औद्योगिकदृष्ट्या होत असलेली प्रगती आणि वाढते रोजगार हे वेगळेपण राहिलेले आहे. यामध्ये नेमका वाटा कुणाचा हे आता येथील मतदारच ठरवणार आहेत.
सोलापूर महापालिकेत आतापर्यंत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपाचे वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे या पालिकेवर आपलेच वर्चस्व ठेवण्यासाठी खरी लढत ही प्रमुख पक्षांमध्येच होणार आहे. यामध्ये भाजपा, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा समावेश होतो. तर ही निवडणुक स्थानिक प्रश्नांवर अवलंबून असते. प्रभागातील उमेदवार आणि प्रचार यंत्रणा यावरही येथील राजकीय समिकरणे अवलंबून आहेत. सोलापूर महापालिकेत एकूण 113 जागा आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 16, अनुसूचित जमातीसाठी दोन आणि महिलांसाठी 48 जागा राखीव आहेत.
यंदा प्रथमच प्रभाग क्रमांक 35 हा अस्तित्वात आलेला आहे. या प्रभागामध्ये सोलापूर शहरातील जुळे सोलापूर, पाण्याची टाकी, कल्याण नगर, गोकुळ नगर, जगदंबा नगर, राऊत वस्ती, विष्णूपूरी, बॉम्बे पार्क, कृष्णा नगर, उध्दव नगर, रेणुका नगर, सोनी कॉलेज, एस.आर.पी कॅम्प व परिसराचा समावेश आहे. त्यामुळे स्थानिक नेतृत्वावर मतदारांची काय भूमिका राहणार हे पहावे लागणार आहे.
सोलापूर महापालिकेत एकूण 113 जागा आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 16, अनुसूचित जमातीसाठी दोन आणि महिलांसाठी 48 जागा राखीव आहेत.अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 लाख 38 हजार 078 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 17 हजार 982 एवढी आहे. सोलापूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत. यंदा होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये एका प्रभागात तीन वार्ड राहणार आहेत. यामधील ‘अ’ वार्ड हा अनिसूचित जमातीमधील महिलेसाठी राखीव आहे. ‘ब’ वार्ड हा सर्वसाधारण महिलेसाठी तर क वार्ड हा सर्वसाधारणसाठी राहणार आहे.
प्रभाग क्रमांक 35 मध्ये 25 हजार 585 एवढी लोकसंख्या आहे. तर यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ही 3 हजार 756 व अनुसूचित जातीची लोकसंख्या ही 1 हजार 412 एवढी आहे. त्यामुळे सर्वसाधरण मतदरांची भूमिका निर्णयाक ठरणार आहे.
सोलापूर महापालिका प्रभाग 35 ‘अ’
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजपा | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
इतर |
सोलापूर महापालिका प्रभाग 35 ‘ब’
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजपा | ||
शिवसेना | ||
कॉंग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
सोलापूर महापालिका प्रभाग 35 ‘क’
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजपा | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |