सोलापूर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचं कौतुक केलं आहे. भारत जोडो यात्रेद्वारे प्रणिती शिंदे यांची ओळख देशाला झाली, असं ते म्हणालेत. पुढील काळ निवडणूकांचा काळ आहेत. सोलापूर काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि आता यापुढे सोलापूर पुन्हा बालेकिल्ला झाला पाहिजे, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
सोलापूरमधील हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये काँग्रेसच्या निर्धार महामेळावा सोलापूरमध्ये झाला. काँग्रेसचे दिग्गज नेते याठिकाणी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे अस्लम शेख यासह अन्य काँग्रेसचे नेते सोलापूरमध्ये होते. तिथे बोलताना बाळासाहेब थोरार यांनी प्रणिती शिंदे यांचं कौतुक केलं.
कसबा, कर्नाटकमध्ये पाहायला मिळाले की देशात सूर बदलतोय. कर्नाटकने इंदिराजी, सोनियाजी यांना निवडून देत देशाची सत्ता दिली. राहुलजींची खासदारकी काढून घेणं भाजपला परवडणारं नाही. पैलवान मुली दिल्लीत उपोषणाला बसल्या आहेत. त्यामध्ये त्या मुलींना न्याय देत नाही. तर मी भाजप आणि आरएस एस सोडणार अशी एक क्लिप फिरत आहे, असंही बाळासाहेब थोरात म्हणालेत.
राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे देखील या मेळाव्यात उपस्थित होते. त्यांनी कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलंय. तसंच भाजपवर टीका केलीय. कर्नाटकातील लोकांनी सांगितले की, यापुढे भाजपचे सरकार राज्यातच नव्हे तर गल्ली बोळातही येणार नाही. बदलाचं वारं वाहण्यासाठी कार्यकर्त्यांनीही प्रयत्न केले पाहिजेत. मी दोनवेळा प्रदेशाध्यक्ष होतो मात्र मी एवढा फिरत नव्हतो. . नाना पटोले हे खूप फिरत आहेत. आता बदल निश्चित आहे, असं सुशील कुमार शिंदे म्हणालेत.
महाराष्ट्र आणि देशात काँग्रेसचा झेंडा फडकवायचा प्रयत्न तुम्ही करताय. देशात परिवर्तनाची लाट देशात स्पष्टपणे दिसतेय. पुढील तीन राज्याच्या निवडणुकीत काय करायचं याचा विचार जनता करत आहेत. त्यामुळे बदल निश्चित होणार आहे. दोन हजाराची नोट फक्त काळा पैसा साठवूण ठेवण्यासाठी केली होती. मुळात तुम्ही दोन हजाराची नोट आणलीच कशासाठी? सर्वसामान्य लोकांना दोन हजारची नोट वापरत नाहीत. मग हा खटाटोप कशासाठी असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर टीका केलीय.