सोलापूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहमदनगरच्या नामांतराच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. महाराष्ट्र सदनात सावरकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उपस्थित होते. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रमध्ये तीव्र नाराजी आहे. अहमदनगरचं अहिल्यादेवीनगर नामांतर या निर्णयाचा आम्ही स्वागतच करतो. पण जो बुंद से जाती है हौद से नही आता है, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मनात अहिल्यादेवी आणि सावित्रीबाई यांच्याबद्दल काय भावना आहेत या दिल्लीतील कार्यक्रमाने दाखवून दिलं आहे. त्यामुळे नामांतराचा मुद्दा जरी पुढे केला असला तरी लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे, असंही ते यावेळी म्हणालेत.
भाजपचा अलीकडे प्रॉब्लेम झालं की अनेक लोक राष्ट्रवादीतून तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे निष्ठावंत कुठे बसवायचं आणि नव्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून तिथं गेलेल्या लोकांना कुठं बसवायचं हा त्यांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे. तो त्यांता अंतर्गत प्रश्न जरी असला तरी काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपतं जी लोकं गेलीत. या सगळ्यांच्या ओझ्याखाली निष्ठावंत मागे ढकलले गेले आहेत, ती अस्वस्थता भाजपमध्ये नक्की आहे, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
जगात ज्या महिलांनी नाव कमावलं. पदक मिळवलं त्यांना खाली रस्त्यावर पाडणं पोलिसांनी तोंडावर पाय ठेवणं, याचा देशातील खेळाडू आणि खेळावर प्रेम करणारी जनता निषेध करते. एका बाजूला संसदेचं उदघाटन करता आणि दुसऱ्या बाजूला आंदोलन चिरडता… संसद उदघाटन सुरु असताना आंदोलन चिरडलं तरी मीडिया दाखवणार नाही यासाठी हे खटाटोप केले गेले. पण जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिलीय भाजपने स्वतःहून कार्यक्रमला गालबोट लावून घेतलं, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
बृजभूषण सिंहवर कारवाई झाली पाहिजे. एवढा पोटतिडकीने मुलींच्या तक्रारी आहेत. त्या तक्रारी गांभीर्यानं घेतल्या पाहिजेत. पण सरकार त्याकडे पाहत नाही. कुणीही आंदोलन केलं तो सरकार त्या विरोधात मनात राग धरणारे, लोकशाही न मानणारे आहेत, असा समज पसरलला जातो, असं म्हणत जयंत पाटलांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.