सागर सुरवसे, प्रतिनिधी सोलापूर | 11 ऑक्टोबर 2023 : आमदार बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीकाही झाली. शिवाय बच्चू कडू यांनीही मंत्रिपदावरू आपली नाराजी वारंवार बोलून दाखवली. यानंतर आता बच्चू कडू यांना भावनिक साद घालण्यात आली आहे. बच्चू कडू यांनी घरवापसी करून परत यावं. त्यांनी मैदानात उतरावं. 2017 ला आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिली आहे. तुम्ही या आपण पुन्हा एकत्रित लढूयात. आता सत्तेत काहीही उरलेलं नाही, अशी भावनिक साद स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी घातली आहे. राजू शेट्टी यांनी आज सोलापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बच्चू कडू यांना साद घातली आहे.
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. रोजगार हमी योजना सुरु करावी लागेल. विमा कंपन्या संरक्षित रक्कम देत नाहीत. त्यामुळे दुष्काळ जाहीर करायला हवा. बच्चू कडू यांची भाषा अशी बदलेल, असं मला कधीही वाटलं नव्हतं. 1 वर्षात खताचे भाव वाढ 22 टक्के होत असेल तर मोदींचे फोटो खताच्या दुकानासमोर का लावायचे? रासायनिक खतावर सबसिडी देतो, म्हणून मोदींचे फोटो लावायला सांगतात. पण खतावर सबसिडी देणारे मोदी सरकार हे पहिलं सरकार नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
एफआरपी देऊन वर 400 रुपये द्यावेत, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. 400 रुपये न दिल्यास आम्ही साखर कारखाने सुरु होऊ देणार नाही. त्याचबरोबर मागील थकित रक्कम मिळाल्याशिवाय आम्ही कारखाना सुरु होऊ देणार नाही. ऊसाची एफआरपी ठरवताना कृषी मूल्य आयोग ऊसाच्या खर्चासोबतच कारखान्याचं उत्पन्नही गृहीत धरतं. जागतिक बाजारात 65 हजार रुपये टन गेली आहेत. मात्र साखरेला बंदी घालतल्याने भारतातील दर कमी आहेत, असं म्हणत राजू शेट्टी यांनी ऊसाच्या दरावर प्रतिक्रिया दिलीय.
साखर निर्यात सुरु केल्यास भाव जास्त मिळेल. क्विंटलपेक्षा 509 रुपये जास्त दराने विक्री केलीय. त्यामुळे आम्ही 400 रुपये मागतोय. 1 टक्के साखरेचं उत्पादन कमी घेतले तर 9 लिटर इथेनॉल तयार होतं. सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवेमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला द्यावा. जोपर्यंत 4 पट मोबदला दिला जात नाही तर आम्ही काम होऊ देणार नाही, असा इशाराच राजू शेट्टी यांनी साखर कारखान्यांना दिला आहे.