सोलापूर : आपल्या बिंधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहाजी बापू पाटलांनी आपल्या रोखठोक भाषेत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना परखड सवाल विचारला आहे. “आम्ही गद्दार, गटारीतील घाण आहे, तर आम्हाला पुन्हा पक्षात कशाला बोलवताय?” असा प्रश्न त्यांनी विचारलाय. “आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढली आहे त्या माध्यमातून ते आम्हाला खूप टाकून बोलत आहेत, आम्हाला अपमानित करत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील आमदार दुखावले जात आहेत. आम्हाला थेट गद्दार म्हणणं योग्य नाही. उलट आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहोत. लोकांच्य मनातील भावनेचा आदर करत आम्ही भाजपसोबत जात आहोत. त्यामुळे आम्ही काही चुकीचं करत आहोत, असं वाटत नाही, जनता आमच्या बाजूने आहे”, असं शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) म्हणाले आहेत.
सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटलांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. “आम्ही गद्दार, गटारीची घाण आहे तर आम्हाला पक्षात कशाला बोलवताय, असं ते म्हणालेत. आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढली आहे. त्या माध्यमातून ते आम्हाला खूप टाकून बोलत आहेत. सातत्याने आम्हाला गद्दार, गद्दार म्हणताहेत, गटार आहे वाहून जाऊ द्या म्हणत आहेत. मग ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही गद्दार आहोत, गटारीची घाण आहोत तर मग आम्हाला पक्षात पुन्हा, पुन्हा बोलवताय कशाला”, असं शहाजी बापू पाटील म्हणालेत.
“महाविकास आघाडीच्या कामांना स्थगिती देणारं हे सरकार वैध आहे काय?”, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय. ” स्वतःच्या काही गोष्टी आहेत जसे आता नवी मुंबईमध्ये आम्ही तिरुपती बालाजीचं मंदिर आणलेलं अयोध्येसाठी आम्ही मागणी केलेली यूपी सरकारकडे की तिथे महाराष्ट्र भवन व्हावं महाराष्ट्रात 10 मंदिर जी प्राचीन आहे त्याला आपण फंड दिलेलं पुन्हा दुसरी धाव घेत होतो आणि एक ठिकाणी मंदिर विकास असेल किंवा धार्मिक स्थळ असतील तर हे असं स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणत असेल तर ह्याची नक्की काय परिस्थिती आहे? काय स्थगिती दिली आहे की पुढे नेतात काम हा पण विचार करणे गरजेचे आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणालेत. ते सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. तिथे ते माध्यमांशी बोलत होते.