BREAKING : भाजपमध्ये गेलेले 6-7 आमदार पुन्हा राष्ट्रवादीच्या संपर्कात, अजित पवारांना फोन – सूत्र

| Updated on: Nov 11, 2019 | 1:53 PM

गरज पडली तर आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत, असं या आमदारांनी अजित पवारांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे आणि साताऱ्यातील हे आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. अद्याप त्याबाबतच्या वृत्ताला दुजोरा नाही.

BREAKING : भाजपमध्ये गेलेले 6-7 आमदार पुन्हा राष्ट्रवादीच्या संपर्कात, अजित पवारांना फोन - सूत्र
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. एकीकडे शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी अनुकूल दिसत आहेत. त्याबाबत अंतिम निर्णय आज संध्याकाळपर्यंत होणार आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही (BJP MLA in touch with NCP) मोठ्या घडामोडी घडत आहेत. कारण भाजपमध्ये गेलेल्या सहा ते सात आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना (BJP MLA in touch with NCP) फोन  केल्याची माहिती मिळत आहे.

गरज पडली तर आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत, असं या आमदारांनी अजित पवारांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे आणि साताऱ्यातील हे आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. अद्याप त्याबाबतच्या वृत्ताला दुजोरा नाही.

लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेक नेते, विद्यमान आमदार भाजपमध्ये गेले होते. याशिवाय अनेकांनी शिवसेनेतही प्रवेश केला होता. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत हे आमदार पुन्हा राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या 4 जणांचा विजय झाला आहे. तर शिवसेनेत गेलेल्या एकाच आमदाराचा विजय झाला.

राष्ट्रवादीतून आलेले भाजपचे तिकीटधारक

  • बबनराव पाचपुते – राष्ट्रवादी ते भाजप – श्रीगोंदा, अहमदनगर – विजयी
  • राणा जगजितसिंह पाटील – राष्ट्रवादी ते भाजप – तुळजापूर, उस्मानाबाद – विजयी
  • नमिता मुंदडा – (आमदार नाही) – राष्ट्रवादी ते भाजप – केज, बीड विजयी
  • शिवेंद्रराजे – सातारा – विजयी

राष्ट्रवादीतून आलेले शिवसेनेचे तिकीटधारक (Incoming Outgoing for Candidature)

  • भास्कर जाधव – राष्ट्रवादी ते शिवसेना – गुहागर, रत्नागिरी – विजयी
  • पांडुरंग बरोरा – राष्ट्रवादी ते शिवसेना – शहापूर, ठाणे – पराभूत
  • दिलीप सोपल – राष्ट्रवादी ते शिवसेना – बार्शी, सोलापूर – पराभूत
  • जयदत्त क्षीरसागर – राष्ट्रवादी ते शिवसेना – बीड, बीड – पराभूत
  • रश्मी बागल – (आमदार नाही) – राष्ट्रवादी ते शिवसेना – करमाळा, सोलापूर – पराभूत
  • शेखर गोरे – (आमदार नाही) – राष्ट्रवादी ते शिवसेना – माण, सातारा – पराभूत

संबंधित बातम्या 

दोन तृतीयांश आयारामांना मतदारांनी घरी बसवलं!    

शरद पवारांची साथ सोडलेल्या आमदारांचं काय झालं?