मुंबई : राज्यातले एसटी कर्मचारी (St Worker Strike) पुन्हा आक्रमक झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी मुबंईतल्या शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर जोरदार आंदोलन केले आहे. एसटीच्या विलीनीकरणात शरद पवारांनी आणि अजित पवारांनी अडथळा आणल्याचा आरोप या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांकडून दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात येत आहे. अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. पोलिसांनी काही आंदोलनकांना ताब्यातही घेतले आहे. आता एसटी कर्मचारी आणि पोलीस यांच्यात वाद रंगतानाही दिसून येत आहे. शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. तसेच या एसटी कर्मचाऱ्यांनी बारमतीत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आम्हाला बारामतीत येण्यापासून थांबवून दाखवा असे थेट आव्हान आता एसटी कर्मचाऱ्यांनी दिलं आहे.
मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहे, त्याला “चोरांचे पुढारी” शरद पवार जबाबदार आहेत, अशा तीव्र प्रतिक्रिया या आंदोलनावेली एसटी कर्मचाऱ्यांनी दिल्या आहेत. “चोरांचे सम्राट शरद पवार आणि अजित पवार” यांच्याविरोधातला हा आक्रोश आहे, अशी तिखट प्रतिक्रिया या एसटी कर्मचाऱ्यांनी दिल्या. जवळपास गेल्या चार महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचं विलीकरणासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र विलीनीकरणावर कोणताही निर्णय झाला नाही. कोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दिलेल्या मुदतीत कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून नका, असेही कोर्टाने म्हटले आहे. मात्र काही एसटी कर्मचारी अजूनही विलीनीकरणावर ठाम आहेत. काल कोर्टाने हा निर्णय दिल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल चढवला होता.
शरद पवारांच्या मनात नाही विलीनीकरण व्हावे, शरद पवारांनी एसटीच्या संपातही राजकारण केलं. हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केला, अजित पवार यांनीही आंदोलनात आणि विलीनीकरणात अडथळा आणला, असा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता. त्यानंतर एसटी कर्मचारी आज पुन्हा आक्रमक झाले आहेत. मात्र हे आंदोलन भाजपने पेटवलं आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शरद पवारांविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न भाजप आणि गुणरत्न सदावर्ते करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आता करत आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून पुन्हा राज्यातलं वातवरण तापलं आहे.
Rahul Gandhi: श्रीलंकेसारखं भारतातही सत्य बाहेर येईल; राहुल गांधी यांचा दावा