एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Workers) आंदोलन चिरघळले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनीच एसटीच्या विलिनिकरणामध्ये अडथळा निर्माण केला, असा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलनाला सुरुवात केली आहे. दरम्यान आंदोलन चिरघळल्याने एसटी कर्मचाऱ्यांकडून दगडफेक आणि चप्पलफेक देखील करण्यात आली. याचदरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील शरद पवार यांच्या घरासमोर जमा झाले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलनस्थळी आले त्यामुळे एसटी कर्मचारी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना देखील शिवीगाळ केल्याचे पहायला मिळाले.
एकीकडे शरद पवार हेच एसटीचे विलिनीकरण न होऊ देण्यास कारणीभूत असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आज एसटी कर्मचाऱ्यांकडून शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात आले. चपला भिरकवण्यात आल्या तसेच दगडफेकही करण्यात आली. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी आज जे काही शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले त्याला गुणरत्न सदावर्ते हेच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींसाठी सदावर्तेच जबाबदार असून, त्यांना चपलीने मारलं पाहिजे असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या कर्यकर्त्यांकडून देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान यावर प्रतिक्रिया देतान सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, एसटी कर्मचाऱ्यांचे हे अशा पद्धतीचे आंदोलन अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत हे असं पहिल्यांदाच घडतंय. मी हात जोडून विनंती करते की हे सर्व थांबवा. आपण चर्चेतून मार्ग काढू, माझी चर्चेला बसण्याची तयारी आहे. काल जे जल्लोष करत होते, ते आज अचानक आंदोलनावर का उतरले? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
Nana Patole: विजेचे संकट ते तपास यंत्रणांचा गैरवापर; पवार- नाना पटोले भेटीत नेमकी चर्चा काय?