कोल्हापूर : एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशावेळी माजी खासदार आणि भाजप नेते धनंजय महाडिक यांनी परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. (Satej Patil should resign, BJP leader Dhananjay Mahadik is aggressive)
‘एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु केलंय. मात्र, या आंदोलनाची साधी दखलही परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी नाही. त्यामुळे पाटील यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी धनंजय महाडिक यांनी केलीय. महाडिक यांनी आज कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सुरु असलेल्या आंदोलनातील एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप महाडिक यांनी केलाय. आंदोलकांसोबत चर्चा करुन मार्ग काढण्यापेक्षा हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं आश्वासन महाडिक यांनी यावेळी दिलंय.
बऱ्याच एसटी कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे. त्यांना संरक्षण देण्याचा निर्णयही आम्ही घेतलाय. इतर कामगारांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करु नये. याबाबत पोलिस आणि एसटीच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा झाल्याचं परब यांनी सांगितलं. तसंच भाजप कार्यकर्ते एसटी कर्मचाऱ्यांना अडवण्याचं काम करत आहेत. कामगारांनो तोल जाऊ देऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आंदोलनात वेळ वाया घालवू नका. जो अहवाल येईल त्याचं बंधन आम्हा दोघांवरही असेल. राजकीय आंदोलन करुन एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही, असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी आहे. पगार वाढवण्याची आवश्यकता आहे. न्यायालयाच्या माध्यमातून संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मिटवावा. प्रवाशांना वेठीस धरणं योग्य नाही. हा संप मिटवण्यासाठी मधला मार्ग काढण्याच्या सरकारच्या हालचाली सुरु आहेत. विरोधी पक्षातील नेते एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देत आहेत. विरोध पक्ष प्रवाशांना वेठीस धरत आहेत. काही राजकीय पक्ष संप चिघळवू पाहत आहेत. भाजप सत्तेत होता तेव्हा एसटीचं विलिनीकरण होत नाही असं सांगत होते. आताच तेच भाजप नेते एसटीच्या विलिनीकरणाची मागणी करत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केलीय.
इतर बातम्या :
‘बऱ्याच कामगारांना कामावर येण्याची इच्छा, त्यांना संरक्षण पुरवणार’, अनिल परबांचा दावा
Satej Patil should resign, BJP leader Dhananjay Mahadik is aggressive