जळगावमध्ये (Jalgaon) गणेश विसर्जन (Ganeshotsav) मिरवणुकीला गालबोट लागलं आहे. अज्ञातांकडून महापौर जयश्री महाजन (Jayshree Mahajan) यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. दगडाफेक का करण्यात आली याबाबतचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. महापौरांच्या घरावर दगडफेकीनंतर दोन गट समोरासमोर आल्याचंही पहायला मिळालं. महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर अचानक अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर जयश्री महाजन यांच्या घराच्या परिसरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. या घटनेत काही वाहनांचे देखील नुकसान झाले आहे.
VIDEO : Jalgaon Mayor Home Dagadfek | विसर्जन मिरवणुकीवेळी महापौर जयश्री महाजनांच्या घरावर दगडफेक – tv9#Jalgaon #MayorJayshreeMahajan #Dagadfek
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/PXbmIaH1Qy pic.twitter.com/l82hSGHMJl
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 10, 2022