भाजपच्या आयटी सेलवर कारवाई करा, सचिन सावंत यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

| Updated on: Feb 29, 2020 | 11:53 PM

भाजपचे नेते तसेच भाजपचे आयटी सेल कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

भाजपच्या आयटी सेलवर कारवाई करा, सचिन सावंत यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Follow us on

मुंबई : देशपातळीवर समाजात तेढ निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमातून अपप्रचार केला (Sachin Sawant letter to CM)  जातो. यामागे भाजपचे नेते तसेच भाजपचे आयटी सेल कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सचिन सावंत यांनी हे पत्र लिहून मागणी केली आहे.

देश पातळीवर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याकरिता अत्यंत द्वेषपूर्ण अपप्रचार समाजमाध्यमातून केला जात आहे. यामागे प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष, त्यांचे नेते आणि त्यांच्या आयटी सेलचे कार्यकर्ते कार्यरत आहेत. याकरिता जाणीवपूर्वक ट्रोल्स निर्माण केले जात आहेत. लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याकरिता खोट्या माहितीचा प्रसार इतर पक्षांच्या नेत्यांचे चारित्र्यहनन आणि अफवा पसरवणारी माहिती पसरवली जात आहे. याकरिता भाजप हजारो कोटी रुपये खर्च करते. काही खाजगी व्यावसायिक कंपन्यादेखील त्यांनी नियुक्त केल्या आहेत, अशी माहिती मिळते, असे सचिन सावंत यांनी पत्रात नमूद केलं (Sachin Sawant letter to CM) आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्ये आपल्या निकालाअन्वये आयटी अॅक्टमधील कलम 66(अ) रद्दबादल केल्यानंतर सायबर कायदा बऱ्याच अंशाने कमजोर झाला आहे. याचाच फायदा भाजपची ही मंडळी आणि समाजकंटक उचलत आहेत. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते तर समाजमाध्यमातून खुल्या पद्धतीने चिथावणीखोर भाषा समाजमाध्यमात वापरत असतात. यातून देशाची आणि राज्याची सामाजिक एकता आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात येत आहे. राज्यात सामाजिक एकतेचे वातावरण अबाधित राहावे याची जबाबदारी शासनाची आहे. त्यामुळे अपप्रचारावर नियंत्रण आणून या समाजकंटकांवर कारवाई करावी, असेही या पत्रात लिहिले आहे.

ज्या समाजकंटक अथवा आरोपींकडून अशा आक्षेपार्ह माहितीचा प्रसार झाला आहे अशांना नोटीस पाठवून त्यांचा जबाब नोंदवला जावा. तसेच जो दोषी सिद्ध होईल त्यांच्या समाजमाध्यमातील कामे कायमचे बंद करण्यात यावे. त्या व्यक्तींच्या कारवायांवर कायम नजर ठेवावी, अशीही मागणी या पत्रातून करण्यात आली (Sachin Sawant letter to CM) आहे.