नागपूर : विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधीमंडळात ठेवण्यात आला. मात्र सुजीतसिंह ठाकूर यांच्या अभिनंदनाची तयारी केली असताना, निवड मात्र प्रवीण दरेकरांची झाली, हल्ली रात्री अनेक निर्णय होतात, असे चिमटे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी भाजपला काढले (Subhash Desai on Pravin Darekar) . नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान देसाई विधानपरिषद सभागृहात बोलत होते.
‘आधी प्रश्न पडला होता की अभिनंदन कोणाचं करायचं? हल्ली रात्री अनेक निर्णय होतात, बदलतात, घटना घडतात. मला विधिमंडळाकडून लेखी माहिती मिळाली की सुजितसिंह ठाकूर यांचे नाव विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते म्हणून निश्चित झाले आहे. म्हणून मी त्यांच्याबद्दल भाषणाची तयारीही केली होती, अखेर प्रवीण दरेकर यांच्या नावाची घोषणा झाली’ असा टोला सुभाष देसाई यांनी लगावला.
मेट्रो कारशेडसाठी रातोरात झालेली झाडांची कत्तल तसंच भाजप सरकार कोसळण्याआधी अजित पवार यांच्या सोबतीने मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांनी भल्या पहाटे घेतलेली शपथ या घटनांचा संदर्भ देसाईंच्या भाषणाला होता.
भाजप आमदार सुरेश धस, भाई गिरकर, सुरजीतसिंह ठाकूर यांची नावंही विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदासाठी चर्चेत होती. मात्र शिवसेना व्हाया मनसेतून भाजपमध्ये आलेल्या प्रवीण दरेकर यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली आहे. सुरजितसिंह ठाकूर यांची विधानपरिषदेते प्रतोद, तर भाई गिरकर यांची विधीमंडळ गटाचे उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला आज 16 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन केवळ 6 दिवस चालणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
कोण आहेत प्रवीण दरेकर?
फडणवीस आणि दरेकर
भाजपकडून विरोधी पक्षनेतेपदाची धुरा आता देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याकडे असेल. देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत तर प्रवीण दरेकर (Subhash Desai on Pravin Darekar) हे विधानपरिषदेत आपला आवाज घुमवतील.