चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीनंतर राजकीय वर्तुळातून त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या या मॅरेथॉन मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला अनेक राजकीय टोले लगावत हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं आव्हानही दिलं. उद्धव ठाकरे यांनी केलेली ही टोलेबाजी भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे (Sudhir Mungantiwar answer Uddhav Thackeray). यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवर यांनी त्याला ‘हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा’ हा फिल्मी डायलॉग असल्याचं प्रत्त्युत्तर दिलं.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “‘हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा’ हा फिल्मी डायलॉग आहे. त्यांचं हे विधान इतरांना उद्देशून नसून स्वतः उद्धव ठाकरे यांना उद्देशून आहे. ज्या दिवशी वाटेल त्यादिवशी ही हिंमत त्यांच्याच कामी येणार आहे. हे वाक्य म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मनातील ‘द्वंद्व’ आहे. 30 वर्ष जुन्या मित्राला बाजूला सारत वैचारिक मेळ नसलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केल्याने ही हिंमत त्यांच्या कामात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला सतत कडवा विरोध केला आणि म्हणून त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे बसले असल्याने हे बळ त्यांच्याच कामी येवो अशा शुभेच्छा. सरकार बाहेरच्या कुठल्याही माणसांनी पडत नाही. मध्यप्रदेश आणि राजस्थान त्याची उदाहरणं आहेत.”
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“30 वर्ष जुन्या शिवसेनेसारख्या मित्राला आणि त्यांच्या नेतृत्वाला कमी लेखण्याची भाजपची कधीच भूमिका नव्हती. मात्र उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केले असेल तर इतरांना पोटदुखी का होईल? उद्धव ठाकरे मित्र आहेतच त्यांनी जनादेशाचा अवमान केला म्हणून त्यांचे महत्त्व आम्ही कमी करणार नाही. त्यांच्या हातून उत्तम काम व्हावे अशी सदिच्छा. केवळ ठाकरेच नव्हे, तर राज्यात कोरोना काळात काम करणारा प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचे काम करत आहे. सरकारच्या कामकाजातील उणिवा सांगणे म्हणजे कमी लेखणे नव्हे”, असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं.
“महाराष्ट्राला भारतापासून वेगळे पाडू नका”
सुधीर मुनगंटीवार, “फडणवीसांनी आपला निधी दिल्लीला दिलाय आणि त्यामुळे त्यांचे लक्ष दिल्लीकडे आहे हा ठाकरे यांचा टोला भारत आणि महाराष्ट्र यांना वेगळा करणारा आहे. कृपया महाराष्ट्राला वेगळे पाडू नका. कोल्हापूर- सांगलीच्या पूर प्रसंगी शिवसेनेने आपल्या आमदारांना शिवसेनेच्या फंडात पैसे देण्यास सांगितले होते हे त्यांनी लक्षात ठेवावे. देशहितासाठी अशी तुलना करु नका- संकुचित होऊ नका. राज्याची हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची थोर परंपरा आहे हेही त्यांनी लक्षात ठेवा.”
“अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र काही लोक राम मंदिराचे भूमिपूजन होऊ नये यासाठी वेगवेगळी कारणे शोधत आहेत. विद्यमान कोरोना संकट आणि राम मंदिराचे भूमिपूजन यांचा संबंध नाही. ज्यांच्या आयुष्यात खुर्ची आणि सत्तेवर आपल्या परिवारातील लोकांची वर्णी लागावी यासाठीची धडपड असते त्यांनाच विरोध सुचतो. अयोध्येत देशभरातील रामभक्त गर्दी करणार नाही. मोजक्या संख्येत हा कार्यक्रम होणार आहे. प्रभू श्रीराम भारतीय आस्थेचे प्रतीक आहे. रामायणात देखील प्रभू श्रीरामचंद्रांना अशाच वृत्तीने त्रास दिला होता. त्याच प्रवृत्ती सध्या मंदिराला विरोध करत आहेत,” असा आरोप मुनगंटीवार यांनी केला.
हेही वाचा :
कोरोना संकटात काम करावंच लागेल, शरद पवारांचं खासगी डॉक्टरांना इंजेक्शन
Sudhir Mungantiwar answer Uddhav Thackeray