मुंबई : माझ्या भाषणात जो अडथळा आणतो, तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही, अशी आरोळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळातच ठोकली. त्यानंतर मुनगंटीवारांचं चॅलेंज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारलं. तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा, असं खुलं आवताणच अजितदादांनी दिलं. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. (Sudhir Mungantiwar challenge accepted by Ajit Pawar)
सभागृहात काय झालं?
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुरवणी मागण्या, हक्कभंग प्रस्ताव अशा विविध मुद्द्यावरुन ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विमानतळापेक्षा एसटी महत्त्वाची आहे, मुख्यमंत्री कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पैसे दिले, पण आमदारांच्या वाहनचालकांना दिले नाहीत. दिव्यांगांचे पैसे दिले नाहीत, असे दावे मुनगंटीवार करत होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर “माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही” असा फटकारा मुनगंटीवारांनी मारला. त्यावर अजित पवारांनीही तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांना निरुत्तर केलं.
मुनगंटीवारांचे जुलै महिन्याचे भविष्य
“ऑक्सफर्ड विद्यापीठाने सीरमसोबत कोरोना लसीसाठी काम सुरु केल्याचं ऐकल्यानंतर मी इंटरनेटवर काही गोष्टी सर्च करत होतो. तेव्हा एक वेबसाईट माझ्यासमोर ओपन झाली. ऑक्सफर्ड विद्यापीठात रसेल फॉस्टर नावाचा एक अभ्यासक आहे. त्याने एक सिद्धांत मांडला आहे, की तुमचा जन्म महिना तुमचे आचरण आणि कृती प्रभावित करतो. म्हणजेच महिन्यानुसार तुमचे व्यक्तिमत्त्व ठरते. माझा, तुमचा (अजित पवार), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा जन्म महिना जुलै आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे-अजित पवार यांच्या हातात महाराष्ट्र निश्चितपणे सुरक्षित असावा, याची मला खात्री झाली.” अशी फटकेबाजी सुधीर मुनगंटीवार करत होते.
“ठाकरे संवेदनशील होते, म्हणून आम्ही एकत्र”
“जुलै महिन्यातील व्यक्तिमत्त्वाचे गुण मी पाहिले. त्यात काय लिहिलंय.. आप मासूम होते हो.. हे पाहिलं ना महाराष्ट्राने… आप दुसरो के प्रती संवेदनशील होते हो… मी एकही शब्द खोटा वाचत नाही.. नाहीतर आयुष्यभर राजकारणातून बाद होईन… ते संवेदनशील होते, म्हणून तर आम्ही एकत्र आलो ना… असं आपोआप एकत्र येतं होय.. आमच्या मनात जनहिताची तीव्र इच्छा आहे…” अशी टोलेबाजी मुनगंटीवारांनी केली. (Sudhir Mungantiwar challenge accepted by Ajit Pawar)
“… पर हमारा रिश्ता तूट गया”
“अजितदादा.. हे तुमच्यासाठी, माझ्यासाठी, मुख्यमंत्र्यांसाठी आणि देवेंद्रजींसाठी लागू होतं… आपको आप के परिवारकी बहुत परवा होती है.. माझं कुटुंब माझा परिवार, हे त्यातून आलं. फक्त एक वाक्य इथे लागू होत नाही. मी त्या रसेल फॉस्टरचा पत्ता घेऊन पाठवणार आहे. आप अपने रिश्ते को बचाने के लिये किसी भी हद तक जा सकते हो… पर हमारा रिश्ता तूट गया.. इथे काहीतरी चुकलं” असा टोमणा मुनगंटीवारांनी मारला. “कठीण परिश्रम के लिये इनके मन में बहुत सन्मान होता है… आणि हे दादांना पाहिलं की मला पटतं. कारण अजितदादा सकाळी सहा-सात वाजता उठून कामाला लागतात. उद्धवसाहेब कठीण परिश्रम घेतात, देवेंद्रजी तर घेतातच. थोडी माझ्यातच कमतरता आहे.” अशी मिश्किल टिपणीही त्यांनी केली.
“मला बाळासाहेबांची आठवण झाली“
“याच्यामध्ये आणखी एक वाक्य आहे… एकनाथराव…. ते मात्र खोटं ठरलं. माता-पिता को तकलीफ पहुचें ऐसा कोई व्यवहार जुलै महिनेमें जनम लेने वाले नही करते… माझ्या डोळ्यासमोर श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे आले… मी त्यांच्या व्हिडीओवर गेलो, त्यांची भाषणं ऐकली… ” असा जोरदार टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.
संबंधित बातम्या :
(Sudhir Mungantiwar challenge accepted by Ajit Pawar)