नागपूर : दोन दिवसांपूर्वीच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) पार पडलाय. त्यानंतर खातेवाटप कधी जाहीर होणार? असा सवाल रोज विरोधकांकडून विचारण्यात येत आहे. मंत्रिमंडळाचं खाते वाटप लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली असतानाच आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungatiwar) यांनी एक मोठं विधान केलंय. दोन दिवसात राज्यातल्या नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर होईल, तसेच येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Elections 2022) जाहीर होतील, अशी माहितीही सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. त्यामुळे मंत्रिमंडलाचा विस्तार नेमका कधी होणार? याचा सस्पन्स आणखीच वाढत चालला आहे. तर दुसरीकडे विरोधक यावरूनच आता रोज सडकून टीका करून लागले आहेत. मात्र सरकार पडल्याची मळमळ असल्याने विरोधक ही टीका करत आहेत, असा टोलाही मुनगंटीवारांनी विरोधकांना लगावलाय.
तसेच राजकारणात पॉलिटिकल अल्झायमर असू नये. निदान टीका तेव्हा करावी जेव्हा ती कृती आपल्या हातून झाली नसावी. अनेकजण निवडणुका त्यात व्यस्त होते. मात्र आता सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविले जात आहेत. फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर पहिला निर्णय ओबीसी संदर्भात घेतला. महविकस आघाडी सरकार तीन कबिनेटमध्ये एकही निर्णय झाला नव्हता. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकार घेत आहे. आधीच्या सरकारने कापूस कोंड्याची गोष्टींसारखे सर्व निर्णय लांबवले, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक विरोधी पक्ष आम्हाला हवा आहे. अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केलीय.
तर पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबत बोलताना ते म्हणाले, पंकजा मुंडे आमच्या आदरणीय नेत्या आहेत. मी त्यांच्या सोबत वैयक्तिक बोलेल, त्यांचं योगदान पक्षासाठी महत्वाच आहे . त्यांनी काय म्हटलं ते मला माहित नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. माझी पात्रता त्यांना वाटली नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल अशी प्रतिक्रिया देत पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली होती.
तर एकनाथ शिंदे गट आणि भाजप मध्ये एक वाक्याता आहे. खातेवाटपाचा याच्याशी संबंध नाही. काँग्रेस आणि शिवसेनेची नैसर्गिक आघाडी नव्हतीच, नाना पटोले काय म्हणाले या पेक्षा बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले याला महत्व आहे, असं विधान त्यांनी केलंय. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणाचा निर्णय बाळासाहेब ठाकरे असताना झाला. 2014 पासून नमंतरासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या, असा दावाही यावेळी मुनगंटीवारांनी केलाय.