नांदेड: वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar accident) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मराठवाडा दौऱ्यात सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar accident) यांच्या वाहनाला अपघात झाला. सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात सुजात यांना किरकोळ दुखापत झाली.
याबाबत सुजात आंबेडकर यांनी व्हिडीओ पोस्ट करुन आपण सुखरुप असल्याचं म्हटलं आहे.
“मी सुजात आंबेडकर. सोमवारी रात्री माझा छोटासा अपघात झाला होता. मी आता ठीक आहे. आजचा (15 ऑक्टोबर) नांदेड येथील माझा नियोजित दौरा मी करणार आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. जमतील तितके दौरे करेन. पण शक्य झालं नाही, तर माफ करा आणि वंचितचं काम सुरु ठेवा” असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलं.
सध्या निवडणुकांची धामधूम सुरु आहे. सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. राजकीय नेत्यांना राज्यभर दौरे करताना, सभास्थळ गाठण्यासाठी दिवसभर, रात्री-अपरात्री प्रवास करावा लागतो. सभास्थळ गाठणं, प्रचारवेळ सांभाळणे, प्रवास हे सर्व करताना नेत्यांना मोठी कसरत करावी लागते.
सुजात आंबेडकर कोण आहे?