मुंबई : बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवीचे (Pohradevi) महंत सुनील महाराज (Sunil Maharaj) यांनी आज अखेर हाती शिवबंध बांधल. त्यांंनी शिवसेनेत (Shiv sena) प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभं राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आज पोहरादेवीची यात्रा आहे. ज्या यात्रेला आपण पंचमीची यात्रा म्हणतो. या यात्रेसाठी दोन लाखांपेक्षा अधिक बंजारा समाज हा पोहरादेवीला आला आहे. असं शुभ मुहूर्त निवडून मी शिवसेनेत प्रवेश केल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच त्यांनी यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पोहरादेवीला येण्याचे निमंत्रण देखील दिले आहे.
सुनील महारजा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आपण उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभं राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ते पुढे बोलताना म्हणाले की, बंजारा समाजाचे जवळपास दोन कोटी मतदार आहेत. या समाजाला विकासाच्या मुख्यप्रवाहात फक्त शिवसेनाच आणू शकते, त्यांना शिवसेनेमुळे सत्तेत वाटा मिळू शकतो यांची खात्री पटल्याने आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्याचं सुनील महाराज यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना सुनील महाराज यांनी शिवसेवा संकल्प दौऱ्याबाबत देखील माहिती दिली आहे. मी उद्धव ठाकरे यांना पोहरादेवीला येण्याचे आमंत्रण दिले आहे, त्यांनी देखील ते मोठ्या आनंदाने स्विकारले आहे. आम्ही राज्यभरात शिवसेवा संकल्प दौरा काढणार आहोत. या दौऱ्याला 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. या दौऱ्याच्या माध्यमातून बंजारा समाज शिवसेनेशी जास्तीत जास्त कसा जोडला जाईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं महंत सुनील महाराज यांनी म्हटलं आहे.