लवकरच कळेल आदित्य ठाकरे यांचा बाप आहे, सुनिल राऊत यांचा कोणावर हल्लाबोल?

| Updated on: Oct 28, 2022 | 2:36 PM

शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्यावर सुरू असलेल्या टीकेला ठाकरे गटाकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

लवकरच कळेल आदित्य ठाकरे यांचा बाप आहे, सुनिल राऊत यांचा कोणावर हल्लाबोल?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : ठाकरे गटाचे नेते सुनील राऊत (Sunil Raut) यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा उल्लेख छोटा पप्पू असा केला होता. प्रकल्प जेव्हा महाराष्ट्रातून गुजरातला गेला तेव्हा त्यांचे वडील मुख्यमंत्री होते, आता जे बोलत आहेत ते कॅबिनेट मंत्री होते. प्रकल्प राज्याबाहेर जाण्याचं पाप हे उद्धव ठाकरे यांच्या काळातील आहे असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं होतं. तसंच छोटा पप्पू आता जे बोलत आहे, ते तेव्हाच बोलायला हवं होतं असंही सत्तार यांनी म्हटलं आहे. सत्तार यांच्या या टीकेवर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते सुनील राऊत यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं सुनील राऊत यांनी काय म्हटलं?

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला राज्यात मिळत असलेला प्रतिसाद पाहून हे सरकार घाबरलं आहे. येणाऱ्या काळात हे स्पष्ट होईल की आदित्य ठाकरे यांचा बाप आहे, असं म्हणत सुनील राऊत यांनी अब्दुल सत्तार यांना जोरदार टोला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

सत्तार यांनी काय म्हटलं होतं?

अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. प्रकल्प राज्याबाहेर जाण्याचं पाप हे ठाकरे सरकारच्या काळातील आहे. आता जे बोलत आहेत त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. ते स्व:त कॅबिनेट मंत्री होते. त्यामुळे देवाण-घेवाण नीट न झाल्यानं प्रकल्प बाहेर गेला का? असा संशय आता राज्यातील लोकांना यायला लागला आहे.  छोटा पप्पू  आता जे बोलत आहे ते तेव्हाच बोलायला हवं होतं असं सत्तार यांनी म्हटलं आहे.