Supreme court on Eknath shinde vs shiv sena : सुप्रीम सुनावणी आज ऐवजी उद्यावर? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता

| Updated on: Aug 22, 2022 | 8:08 AM

एकूण पाच याचिकांवर 22 ऑगस्ट रोजी म्हणजे आज ही सुनावणी पार पडेल, असं सांगितलं जात होतं.

Supreme court on Eknath shinde vs shiv sena : सुप्रीम सुनावणी आज ऐवजी उद्यावर? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता
सुप्रीम कोर्ट
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावरील (Maharashtra Political Crisis) आजची सुनावणी आजऐवजी उद्या (23 ऑगस्ट) होण्याची शक्यता आहे. एकूण पाच याचिकांवर 22 ऑगस्ट रोजी म्हणजे आज ही सुनावणी पार पडेल, असं सांगितलं जात होतं. मात्र तांत्रिक अडचणींमुळे ही सुनावणी आता मंगळवारी होईल, असं सांगितलं जातंय. त्यामुळे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टातली (Supreme court on Eknath shinde vs shiv sena) सुनावणी लांबणीवर पडल्याचं बोललं जातंय. आज होणाऱ्या सुनावाण्यांच्या यादीत समाविष्ट असणारी सुनावणी बदलण्यात आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे गेली आहे. याआधी 12 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात (Supreme Court News) सुनावणी पार पडणार होती. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेनं सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावून दाद मागितली आहे. एकूण पाच याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. या पाचही याचिकांचा एकमेकांशी थेट संबंध असून राजकीय गुंतागूत वाढवणारी ही पाचही प्रकरणं आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतं, याकडे संपूर्ण राज्याचंच नव्हे, तर देशाचं लक्ष लागलंय.

दरम्यान, कोणकोणत्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे, त्यावर एक नजर टाकुया..

पाहा व्हिडिओ

हे सुद्धा वाचा

खरी शिवसेना कुणाची, यावरुन आता न्यायालयीन लढाई सुरु आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा हा थेट सामना असून या सामन्यात कोण बाजी मारतं, हे पाहणं महत्त्वाचंय. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील चाळीस आमदारांसह बंडखोरी करत आपणच खरी शिवसेना आहोत, असा दावा केलाय. तर दुसरीकडे बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरुनच उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करत गटनेते पद पुन्हा स्वतःकडे घेत प्रतोद म्हणून भरतशेट गोगावले यांची नेमणूक केली होती.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांची नेमणूक गटनेतेपदी केली होती. त्यानंतर 12 बंडखोर आमदारांच्या निलबनाचीही मागणी केली होती. नरहरी झिरवळ या विधानसभा उपाध्यक्षांबाबत अविश्वास प्रस्ताव, नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड, शिवसेना कुणाची, धनुष्यबाण हे चिन्ह कुणाकडे जाणार आणि राज्यपालांची भूमिका, अशा एकमेकांमध्ये गुंतलेल्या राजकीय वादावरुन सुप्रीम कोर्टातील विशेष खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीचा महत्त्वपूर्ण टप्पा सोमवारी पार पडेल अशी अपेक्षा होती. मात्र आता मंगळवारी याबाबत नेमकं काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.