मुंबई : एकनाथ शिंदे (supreme court hearing Live) यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांना शिवनेतील (Eknath shinde vs shiv sena Live) एका मोठा आमदारांच्या गटाचा पाठिंबा मिळाला होता. याचा आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र आता शिवसेनेच्या वतीने या आमदरांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशा मागणीची याचिका सुप्रीम कोर्टात (shiv sena Live vs Eknath shinde) दाखल करण्यात आली आहे. सोबतच शिंदे सरकारने विधानसभेत विश्वास ठराव जिंकला त्याविरोधात देखील शिवसेनेच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे. आज शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. याच सुनावणीवर शिंदे सरकारचे पुढील भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
उद्या सुप्रीम कोर्ट सत्याच्या बाजूने निर्णय देईल आमचा विजय होईल
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया
सुप्रीम कोर्टात स्पष्ट झालंय शिंदे गट सत्तेसाठी भाजपच्या कुशीत जाऊन बसलाय
आधी म्हणायचे आमचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आहेत
आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे आता त्रास आहे
मात्र आता कोर्टात वकिलांनी सांगितलं
यांना उद्धव ठाकरेंच नको होते
यांना धनुष्यबाण हवाय महाराष्ट्रात खोटं बोलतायेत
सत्तेसाठी हे भुकेले आहेत
सत्याचा विजय होईल
पक्ष प्रमुखांच्या पाठीत यांनी खंजीर खुपसलाय
दुध का दुध पाणी का पाणी आज कोर्टात झालंय
सत्याला वेळ लागतो मात्र निर्णय होतो
देशाचं संविधान रक्षणाची जबाबदारी कोर्टावर आहे
फक्त महाराष्ट्राला नाही तर देशासाठी हे प्रकरण खूप महत्वाचं आहे
सरकार पडेल का यावर मात्र बोलणं टाळलं
आज शिवसेनेने शिंदे गटाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने आता या प्रकरणावर उद्या सुनावणी ठेवली आहे. यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कदाचित उद्या न्यायालय हे प्रकरण घटनापीठाकडे देण्याचा निर्णय घेऊ शकते असे बापट यांनी म्हटले आहे. तसेच न्यायालयाचा निर्णय 15 दिवसांच्या आत येणं अपेक्षित असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
कोर्टाने आज शिंदे गट आणि शिवसेनेची बाजू ऐकूण घेतली. आता या प्रकरणावर पुढील सुनावणी गुरुवारी म्हणजे उद्या ठेवण्यात आली आहे. उद्याच काय ते ठरवू असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
आज हरिष साळवे यांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटले आहे की, मुख्यमंत्री बदलाची मागणी ही पक्षविरोधी ठरवता येणार नाही. मुख्यमंत्री भेटत नसल्याने शिंदे गटाकडून मुख्यमंत्री बदलाची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही.
आम्ही उच्च न्यायालयात न जाता थेट सुप्रीम कोर्टात आलो कारण त्यामागे धमकीचा मुद्दा होता असे निरज कौल यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले आहे. तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात का आलात असा सवाल न्यायालयाने निरज कौल यांना केला होता. यावर निरज कौल यांनी उत्तर दिले आहे.
निरज कौल यांचा युक्तिवाद सुरू
आम्हाला धोका वाटत होता म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात आलो कौल
जर स्पिकरवर अपात्रतेची नोटीस असेल तर स्पिकरला निर्णय घेतला येतो का?
न्यायालयाचा शिंदे गटांच्या वकिलांना सवाल
साळवेंकडून सुप्रीम कोर्टात अरुणाचल प्रदेशचा दाखला
राज्यपालांनी बोलवलेल्या अधिवेशनावर अनेक प्रश्न – कोर्ट
आता विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील अंस तुम्हाला म्हणायचं आहे का?
कोर्टाचा शिंदे गटाच्या वकिलाला सवाल
धुळे मनपाच्या महासभेत रामाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ
सर्वच नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन देऊन शहरातील नागरिकांना तिरंगा उपलब्ध करून द्यावा
असा मुद्दा भाजपा नगरसेवकाने मांडून झाल्यावर
काँग्रेस नगरसेवक साबीर शेख यांनी काय रामायण लावले?
असा शब्द काढताच सभागृहात भाजपा नगरसेवक आक्रमक
रामाच्या मुद्द्यावरून भाजपा नगरसेवकांनी शेख यांना धारेवर धरत माफी मागण्यास भाग पाडले
सभागृहात भाजप नगरसेवकांकडून जय श्रीराम च्या घोषणा
अखेर काँग्रेस नगरसेवक साबीर शेख यांनी माफी मागितल्याने वादावर पडदा
तुमच्यासाठी निवडणूक आयोग का महत्त्वाचा आहे, असा सवाल शिंदे गटाचे वकील हरिष साळवे यांना सुप्रीम कोर्टाने विचारला याला प्रत्युत्तर देताना साळवे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडामोडी सुरू आहेत. बीएमसी निवडणूक जवळ आली आहे. चिन्ह कोणाला मिळावे? यासाठी आमच्यासाठी निवडणूक आयोग महत्त्वाचा आहे.
उदय सामंत यांच्यावर हल्ला, ही उत्स्फुर्थ प्रतिक्रिया
फुटीर गटाने सरकार स्थापन करण्याचा जो प्रयत्न केलेल्या आहे
अध्यक्षांची निवड, बहुमत जे सिद्ध करून दाखवलं आहे
त्याला आक्षेप घेतला आहे
न्यायालयाचे आदेश शिरसावंद्य असतात
त्यामुळं सर्व प्रकारचे सहकार्य न्यायव्यवस्थेला करत असतो
जिथे जिथे अन्याय होईल तिथे दाद मागणारच
शिवसेनेंतर्गत अनेक अडचणी कपिल सिब्बल यांचा वाद चुकीचा – साळवे
साळवेंकडून 1969 मधील काँग्रेस फुटीचा दाखला
आम्ही एकाच पक्षाचे मात्र नेता कोण हा प्रश्न – साळवे
पक्षात दोन गट पडू शकत नाही का?
हरिष साळवेंचा कोर्टात युक्तिवाद
विधानसभाध्यक्षांच्या भूमिकेवर संशय – सिंघवी
बहुमतावर 10 व्या सुचिचे नियम बदलू शकत नाहीत – सिंघवी
अभिषेक मनु सिंघवींच्या युक्तिवादाला सुरुवात
विलीनीकरण हाच शिंदे गटापुढे एकमेव पर्याय
मात्र शिंदे गट अद्याप कोणत्याही पक्षात विलीन झाला नाही – अभिषेक मनु सिंघवी
पक्षांतरविरोधी कायदा डोक्यावर घेतला जात आहे
अभिषेक मनु सिंघवींचा न्यायालयात जोरदार युक्तिवाद
उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख , सिब्बल यांचा दावा
शिंदे गटही तसे मानतो – सिब्बल
त्यांच्या याचिकेत तसा उल्लेख – सिब्बल
शिंदे गटाच्या सर्व हालचाली बेकायदेशीर – सिब्बल
शिंदे गट शिवसेनेवर दावा करू शकत नाही – सिब्बल
मूळ पक्ष असल्याचे आयोगासमोर सिद्ध करावे लागेल – सिब्बल
मूळ पक्षाची व्याख्या सिब्बल यांनी न्यायालयात मांडली
मुख्यमंत्री कोणाला करायचं हे पक्ष ठरवत असतो त्याचा अधिकार आमदारांना नाही
सभागृहातील पक्ष हा मूळ राजकीय पक्षाचा एक छोटासा भाग आहे – सिब्बल यांचा कोर्टात दावा
व्हीप मान्य केला नाही तर आमदार अपात्र कसे ठरतात याबाबत कपील सिब्बल यांचा युक्तिवाद
गट वेगळा असला तरी शिंदे गटातील आमदार हे शिवसेनेचेच सदस्य
गुवाहाटीला बसून मूळ राजकीय पक्ष कोणता ते ठरवता येणार नाही – सिब्बल
मूळ पक्षाबाबत निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचा अधिकार
सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा शिवसेनेने शिंदे सरकारविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू झाली आहे. सध्या शिवसेनेचे वकील कपील सिब्बल आणि तुषार मेहतांमध्ये युक्तीवाद सुरू आहे. सत्तासंघर्षात राज्यपालांची भूमिका होती असा दावा सिब्बल यांनी केला आहे.
सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणीला सुरुवात
एकूण पाच याचिकांवर सुनावणी
शिवसेनेकडून आम्ही प्रतिज्ञापत्र सादर केलं – सिब्बल
आज शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या 16 आमदारांच्या अपात्रेवर सुनावणी होणार आहे. सुनावणीला सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर थोड्यावेळासाठी सुप्रीम कोर्टाने सुनावणी थांबवली आहे.
अविनाश भोसलेंची 164 कोटींची संपत्ती जप्त
संजय छाब्रिया यांची 251 कोटींची मालमत्ता जप्त
आज शिवसेनेने एकनाथ शिंदे आणि शिंदे समर्थक आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल आणि सुभाष देसाई यांच्यामध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली. आज सुनावणीमध्ये मांडण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
चारकोप विधानसभेतील उत्तर भारतीय तरुण मनसेत पदाधिकारी होणार
चारकोप विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी
यांच्या नेतृत्वाखाली उत्तर भारतीय युवक शिवतीर्थावर पोहोचले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार
शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, यासाठी शिवसेनेच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र अपाध्यक्षांची कारवाई अयोग्य असून, विधानसभेचे अध्यक्ष नियुक्त झाल्याने आधी हे प्रकरण अध्यक्षांकडे जावं असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील सुप्रीम कोर्टात करणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच आजच्या सुनावणीमध्ये उपाध्यक्षांचे घटनात्मक अधिकार काय ? यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टात शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर
आज सुप्रीम कोर्टात सूनावणीआधी सगळ्यांची पत्र दाखल
16 आमदारांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
सुप्रीम कोर्टानं सुभाष देसाईंची याचिका लीड म्हणून पुढे आणली
16 आमदारांवरची अपात्रतेची कारवाई योग्य, देसाई यांच्या याचिकेत दावा
कोर्ट आजच निकाल देणार किंवा प्रकरण घटनापीठाकडे वर्ग होण्याची शक्यता