मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जेवणाचं आमंत्रण दिलं आहे. “चंद्रकांतदादा लवकर घरी जेवायला या, खास बेत करते”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) खास आमंत्रण दिलं आहे. ‘बस बाई बस’ (Bus Bai Bus) या झी मराठीवरच्या कार्यक्रमात त्यांना चंद्रकांत पाटलांच्या एका विधानाविषयी कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सुबोध भावेने (Subodh Bhave) प्रश्न विचारला तेव्हा सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांतदादांना जेवणासाठी आमंत्रित केलं. पुण्यात एका ठिकाणी बोलताना सुप्रिया सुळेंनी राजकारणापेक्षा घरात लक्ष द्यावं, असं म्हटलं होतं. त्याला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. “मला घरातील काम किंवा स्वयंपाक करायला कधीही कमीपणा वाटत नाही, उलट मला जेवण बनवून खावू घालायला आवडतं. त्यामुळे चंद्रकांत पाटलांचं ते विधान मी फार मनावर घेत नाही”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“चंद्रकांतदादा लवकर घरी जेवायला या, खास बेत करते”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटलांना खास आमंत्रण दिलं आहे. बस बाई बस या झी मराठीवरच्या कार्यक्रमात त्यांना चंद्रकांत पाटलांच्या एका विधानाविषयी कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सुबोध भावेने प्रश्न विचारला तेव्हा सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांतदादांना जेवणासाठी आमंत्रित केलं.
राजकीय ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने मोर्चा काढला होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी”सुप्रिया सुळे, तुम्ही घरी जाऊन स्वयंपाक करा, नाहीतर कुठेही जा मसनात जा, पण आरक्षण द्या” असे म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राज्यात जोरदार वादंग निर्माण झालं. तर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उडवली होती. तसेच हे प्रकरण आता थेट महिला आयोगाकडे पोहोचलं होतं. याविषयीच सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला.
“माझ्या मतदारसंघाचा खासदार निधी अडकला आहे. तुमचे आणि मोदीजींचे संबंध चांगले आहेत. तुम्ही त्यांना तो निधी द्यायला सांगा ना, खूप कामं रखडली आहेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.