मुंबई : भाजप नेते आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर दीपा चव्हाण यांनी गंभीर आरोप केले आहेत. गणेश नाईक यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. तसंच आपली फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केलाय. या प्रकरणात नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. तसंच पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याबाबत आज ठाणे कोर्टात (Thane District Court) सुनावणी पार पडली. एकीकडे गणेश नाईकांसारख्या बड्या नेत्यांवर लैंगिक अत्याचारासारखे गंभीर आरोप झाले आहेत. तर दुसरीकडे एकही राजकीय नेता या प्रकरणी जास्ती बोलायला तयार नाहीत. अशावेशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक महिला म्हणून आपलं मत व्यक्त केलंय. नाईक प्रकरणाबाबत बोलताना सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुलं पार्थ पवार आणि जय पवार, तसंच आपल्या मुलांचाही दाखला दिला.
नाईक प्रकरणावर बोलताना सुळे म्हणाल्या की, ‘मला सगळ्यात जास्त एका गोष्टीचं वाईट वाटतं ते त्या छोट्या मुलाचं. त्याचा विचार आपण कधीच करत नाही. जेव्हा आरोप प्रत्यारोप होतात तेव्हा कुटुंब आणि कुटुंबातील मुलं कशातून जातात याबाबत मी संवेदनशील आहे. कारण कधी मी ही व्हिक्टिम राहिलेली आहे आणि माझी मुलंही व्हिक्टिम आहेत. पार्थ, जय तरी मोठी झाली आहेत. माझी मुलंही आता थोडी मोठी झाली आहेत. आमची चार मुलं हे कशातून अनेकवेळा जातात ते मला, दादा आणि सदानंदलाच माहिती. मी कधी कुणाची मुलं असतात तेव्हा मी बोलत नाही. माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. तुम्ही मी बुद्धू वाटेल पण ती लक्ष्मणरेषा मी कधी क्रॉस करतनाही ‘.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या माझी मुलंही व्हिक्टिम आहेत, या वक्तव्यामागे एक वेगळा संदर्भ असण्याची शक्यता आहे. त्यांनी अजित पवार, तसंच आपल्या मुलांबाबत वक्तव्य करताना राजकारणात होणारे आरोप प्रत्यारोप, विरोधकांची टीका, राजकारणामुळे होणारी ओढाताण, घरात वेळ न देता येणं, अशा स्थितीत मुलांची झालेली वाढ या गोष्टींचा संदर्भ देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे.
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा महिला खासदार म्हणून या प्रकरणावर मत देणार नाही. मी फक्त एक महिला आणि माणुसकीच्या नात्यानं यावर मत देऊ शकते. कारण हे अतिशय दुर्देवी आहे. मला एका गोष्टीचं अतिशय वाईट वाटतं की, एका आमच्या भगिनीवर असं झालेलं आहे आणि ज्या रितीने आमच्या भगिनीचे फोटो बाहेर आलेले आहेत. ते माझ्या मनाला किंवा माझ्या संस्कृतीला न पटणारं आहे. तुम्हाला जर कुणाचे फोटो दाखवायचे असतील, तर मी कोण कुणाच्या मॉरॅलिटीवर बोलणार. पण हे दुर्दैवं आहे की अशा गोष्टी समाजात होतात. मला अजून पुढे जाऊन म्हणायचं आहे की अशा गोष्टी होणार असतील तर त्या त्या ठिकाणी मिटवल्या गेल्या पाहिजेत. त्या कुठेही पेपरला किंवा टीव्हीला येऊ नयेत. कारण एका महिलेची, कुटुंबाची बदनामी होती.
इतर बातम्या :