पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज थेट भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना विनंती केली आहे. राज्याच्या राजकारणात (Maharashtra politics) सुरु असलेले गलिच्छ आरोप-प्रत्यारोप थांबवा. मी माझ्या पक्षापासून सुरुवात करते. अनेक महिन्यांपासून हे सत्र सुरु आहे. महिलांना माते समान सन्मान आहे, तिथे हे घडतंय, हे दुर्दैव असल्याची खंत सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवली.
विचित्र कपडे घालणाऱ्या उर्फी जावेद हिच्यावरू सध्या राज्यात महिला नेत्यांचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी हे उत्तर दिलं.
त्या म्हणाल्या, ‘ माझी सर्वांना विनंती. आरोप प्रत्यारोप थांबले पाहीजेत. अनेक महिन्यांपासून मी पाहत आहे. अनेक पक्षांच्या नेत्यांवर होत आहेत. महिलांना मातेसन्मान जिथे होते तिथे हे घडतंय….
अनेक आठवडे संधी मिळते तिथे सांगतेय हे थांबवा… मी माझ्या पक्षापासून सुरुवात करते की हे थांबवू… देवेंद्र फडणवी यांनी पुढाकार घेवून गलिच्छ राजकारण थांबवावं. प्रत्येकाच्या घरात मुली आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ऊर्फी जावेद हिच्या कपड्यांवरून भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. उर्फीने सार्वजनिक ठिकाणी बरे कपडे घालावेत, यासाठी तिला समज देण्यात यावीत, अशी विनंती चित्रा वाघ यांनी पोलिसांनाही केली आहे. पुन्हा ती अशा कपड्यांत दिसल्यास तिला चोप दिला जाईल, अशी भूमिका इतरही महिला संघटनांनी केली आहे.
तर महिला आयोगाने उर्फी विरोधात तत्काळ कारवाई करण्याची मागणी या संघटनांनी केली आहे. यानंतर महिला आयोगाने चित्रा वाघ यांनाच धारेवर धरलंय. तर उर्फी जावेदतर्फेही चित्रा वाघांना उलट सवाल विचारण्यात आलेत.
बेळगाव प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटक सीमाप्रश्नावर कोर्टात काय होते पाहू, असे म्हटल्यानंतरही कर्नाटतच्या मुख्यमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोटचेपी भूमिका घेतात, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय.