पुणे : राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या (ayodhya) दौरा रद्द झाला. अयोध्या दौरा रद्द होण्यामागे त्यांच्या पायाचे दुखणे हे कारण असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. अखेर आज राज ठाकरे यांनी आपल्यावर नेमकी कोणती शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे याबाबत खुलासा केला आहे. ते आज पुण्यातमध्ये आयोजित सभेमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, मी जेव्हा मागे पुण्यात आलो होतो, तेव्हाच मला पायाच्या दुखण्याचा त्रास सुरू झाला होता. जेव्हा मी मुंबईत परतलो तेव्हा काही टेस्ट करण्यात आल्या त्यामध्ये मला हिप बोनची (Hip bone) शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. एक जूनला शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. म्हणूनच मी मुद्दामहून तुम्हाला याबद्दल माहिती दिली. तुम्हाला न सांगताच शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलो तर पत्रकार काहीही सांगू शकतात. असे म्हणत त्यांनी यावेळी पत्रकारांना देखील टोला लगावला आहे.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी पत्रकारांना देखील टोला लगावला आहे. मी जर तुम्हाला न सांगताच शस्त्रक्रिया करण्यासाठी निघून गेलो तर उद्या पत्रकार काहीही दाखवू शकतात. त्यामुळे मी आज मुद्दामहून तुम्हाला माहिती देण्यासाठी आलो आहोत. पत्रकार काय दाखवतील त्याला काही मर्यादा नाही. त्या दिवशी मी पुस्तक खरेदी करण्यासाठी गेलो तर पत्रकार तेही दाखवत होते. राज ठाकरे कधी गाडीत बसतात कुठे निघतात कुठे जातात, हे सर्व पत्रकार दाखवत असतात. मला देखील त्याचा वैताग येतो. असो ते त्यांचे काम करतात असे देखील यावेळी राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान सभेच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला. राज ठाकरे यांनी सभेसाठी मैदानाची निवड न करता सभागृहाची निवड केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. यावर बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवार यांना टोला लगावला. आज पावसाचे वातावरण आहे. पाऊस पडू शकतो त्यामुळे आज इथे सभा घेत आहे. सध्या निवडणूक पण नाही. मग उगच का पावसात भिजायचे असे म्हणते राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.