नवी दिल्ली : काँग्रेसनं (Congress) शनिवारी सरकारच्या रोजगार मेळाव्याला (Employment Fair) जुमला किंग असल्याची टीका केली. देशातल्या युवकांना 16 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. काँग्रेसचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सत्तेवर आल्यानंतर दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. गेल्या आठ वर्षांत ही घोषणा फोलं ठरली, असल्याचा दावा सुरजेवाला यांनी केला. भारत जोडो यात्रा फक्त चार राज्यांतून जात आहे. पण, देशात बेरोजगारी मोठी समस्या असल्याचं ते म्हणाले.
इव्हेंटबाजी नाही, रोजगार द्या. रणदीप सुरजेवाला यांनी व्हिडीओ ट्वीट केला. त्यात ते म्हणतात, 16 कोटी नोकऱ्या केव्हापर्यंत दिल्या जातील. सरकारी विभागांतील 30 लाख पदं केव्हापर्यंत भरली जातील. पंतप्रधानांना देशातल्या युवकांना उत्तर द्यावं लागेल.
अभी तो #BharatJodoYatra 4 प्रांत से गुजरी है, आख़िर “जुमला किंग” को राहुल जी ने ये मानने को मजबूर कर दिया की बेरोज़गारी देश की सबसे बड़ी समस्या है।
पर दिन-तारीख़-महीना बतायें कि 8 साल में 16 करोड़ रोज़गार कब मिलेंगे?
30 लाख सरकारी नौकरी कब तक देंगें?
इवेंटबाज़ी नहीं रोज़गार दो pic.twitter.com/1l3Zkl3Hhh
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) October 22, 2022
फक्त 70 हजार नियुक्ती पत्र देऊन होणार नाही. देशातील युवकांना नोकऱ्यांची गरज आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी आणि काँग्रेस पंतप्रधानांना प्रश्न विचारत असतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 10 लाख नोकर भरतीच्या अभियानाची सुरुवात केली. ते म्हणाले की, जग कोविडनंतर आर्थिक समस्यांशी झुंज देत आहे. 75 हजार नियुक्ती पत्र वितरित केल्यानंतर रोजगार मेळाव्यात ते बोलत होते.
केंद्र सरकार युवकांना रोजगार मिळावा, यासाठी काम करत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. या अभियानाअंतर्गत 50 केंद्रीय मंत्री देशातील विविध ठिकाणी जवळपास 20 हजार लोकांना नियुक्ती पत्र देणार आहेत.