सर्वात मोठी बातमी ! मी शिवबंधन सोडायला तयार, पण… सुषमा अंधारे यांचं भाजपला नेमकं आव्हान काय?

| Updated on: Nov 16, 2022 | 12:46 PM

भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस आहे. माधव भंडारी आणि केश उपाध्ये यांना कधीच मानाचं स्थान मिळालं नाही. पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे.

सर्वात मोठी बातमी ! मी शिवबंधन सोडायला तयार, पण... सुषमा अंधारे यांचं भाजपला नेमकं आव्हान काय?
मी शिवबंधन सोडायला तयार, पण... सुषमा अंधारे यांचं भाजपला नेमकं आव्हान काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोल्हापूर: शिवबंधन सोडून मी किरीट भाऊच्या नावाचा गंडा बांधते. पण त्यांनी राणेचा बंगला अधिकृत आहे का? नसेल तर राणेंचा बंगला का तोडला नाही ते सांगावं? भाजपमध्ये आल्यानंतर आरोप असलेल्या नेत्यांची कारवाई थांबते. भाजपकडे असं कोणतं वॉशिंगमशीन आहे, हे एकदा भाजपनं स्पष्ट करावं, असं आव्हानच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिलं आहे. सुषमा अंधारे या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

भाजपा कपटी कारस्थानी करणारी आहे. भाजपने द्वेषमूलक राजकारण सुरू केलं आहे. हे राजकारण संपून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. तसेच
शिंदे गट हा माझा भाऊच आहे. शिंदे गटात गेलेल्यांना आता पश्चाताप होत आहे, असा दावा त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही नेत्यांनी या संदर्भात एकमेकांशी फोनवरून संवाद साधल्याचीही चर्चा होती.

येत्या 20 तारखेला हे दोन्ही नेते भेटणार असल्याचंही सांगितलं जात होतं. पण ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या दाव्यानुसार ठाकरे आणि आंबेडकरांची भेट रद्द झाली आहे. त्यामुळे राज्यात होऊ घातलेल्या नव्या समीकरणांना खिळ बसल्याचं सांगितलं जात आहे.

येत्या 20 तारखेला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबडेकर यांची भेट होणार होती. पण वंचित कडून अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. वंचितकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आव्हाड यांच्यावर असा विनयभंगाचा गुन्हा दाखल होत असेल तर देवेंद्र भाऊ, अब्दुल सतार आणि गुलाब पाटील यांचा माज कसा उतरवणार? असा सवाल करतानाच देवेंद्र भाऊ पक्षपाताचे, सूडबुद्धीचे राजकारण करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

40 आमदार आम्हाला सोडून गेले असले तरी पुन्हा 40 आमदार निवडून आणणार आहोत. संजय राऊत तर म्हणाले आहेत 103 दिवस आत राहिलो 103 आमदार निवडून आणेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस आहे. माधव भंडारी आणि केश उपाध्ये यांना कधीच मानाचं स्थान मिळालं नाही. पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे.

संजय शिरसाट यांची नाराजी आहे. शिंदे गटातच मंत्रीपदावरून धुसफूस आहे. त्यामुळे हे सरकार कोसळेल आणि 2023 मध्ये मध्यावधी निवडणुका लागतील, असं भाकीत करतानाच भाजपच शिंदे गटाला फोडण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावाही त्यांनी केला.