मुंबई : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत सुषमा अंधारे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांचा भाजप कडून टूल म्हणून वापर होत असल्याची घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काड्या करण्यात आणि 40 बाहुल्यांचा सूत्रे हलवण्यात व्यस्त असल्याचेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
नोटांवरुन देखील चांगलच राजकारण तापलं आहे. यावर देखील सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे. भाजप नेते राम कदम यांनी नोटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्याची मागणी केली आहे.
नशीब आमदार राम कदम यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही. अंध भक्ती किती असावी याचे हे उदाहरण आहे असं म्हणत सुषमा अंधारे यांनी राम कदम यांची खिल्ली उडवली.
चलनी नोटांवरून जाती जातीत भांडणे लावण्याचा प्रकार आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरु आहे. या पेक्षा आंतर राष्ट्रीय बाजारात चलनाची पत घसरली आहे. ती कशी सुधारावी याचा विचार करावा. आंतरराष्ट्रीय ताकत होती. ती कुठे आहे असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
आनंदाच्या शिधा वरून आनंद दिघे यांचा फोटो गायब आहे. एकनाथ शिंदे कुणाचे वारसदार आहेत. मोदींचा फोटो लावला पण बाळासाहेबांचा नाही अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
राणे पिता पुत्र सैराट प्रमाणे सुटले आहेत . पण कारवाई काही होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऐकनाथ शिंदे झाले आहेत. भाजप हे जाणून बुजून राज्यात एक संदेश देते की मराठा मुख्यमंत्री आहेत. त्यांना बुद्ध्यांक कमी आहे. असे दाखवले जात आहे.
सरकार कडून ओला दुष्काळ जाहीर होत नाही. विमा कंपन्यांना कोणाचा वरदहस्त आहे. की या कंपन्या निर्ढावल्या आहेत. 531 कोटी शेतकऱ्यांना कधी मिळतील असी सवालही अंधारे यांनी उपस्थित केला आहे.