मी राजीनामा द्यायला तयार, सुषमा अंधारे म्हणाल्या… मी पक्षाबाहेर राहणं त्यांच्यासाठी जास्त घातक; पण त्याआधी….

| Updated on: Dec 16, 2022 | 12:14 PM

माझ्यासाठी माझा पक्ष महत्त्वाचा आहे. मला पक्षासाठी काम करायचं असेल तर मी कुठूनही करू शकते, अशी तयारी सुषमा अंधारे यांनी दर्शवली आहे.

मी राजीनामा द्यायला तयार, सुषमा अंधारे म्हणाल्या... मी पक्षाबाहेर राहणं त्यांच्यासाठी जास्त घातक; पण त्याआधी....
Image Credit source: social media
Follow us on

पुणेः पक्षाने आदेश दिले तर मी राजीनामा देण्यास तयार आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दिली आहे. मात्र माझा राजीनामा (Resignation) घेण्याआधी तुम्ही राज्यपालांचा (Governor) राजीनामा घेणार का, असा सवाल त्यांनी आरोप करणार्यांना विचारलाय. राजकीय सुडापोटी माझ्यावर आरोप केला जातोय. माझ्यामागे ईडी लावता येत नाही, म्हणून धार्मिक वाद पेटवण्याचा हा प्रयत्न आहे, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय. पुण्यात त्यांनी टीव्ही9 शी बातचित केली.

सुषमा अंधारे यांनी पूर्वी हिंदू देवी-देवता तसे साधु संतांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय अंधारे यांच्याविरोधात आक्रमक झाला आहे.

शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर मी अशी वक्तव्ये करत नाही. आधी मी भाष्य केलं असलं तरीही त्यामागील लॉजिक समजून घेतलं पाहिजे. माझ्या बोलण्याने वारकरी संत संप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागण्यात गैर वाटत नाही, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली होती.

तरीही सुषमा अंधारे यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी होत आहे. वारकरी संप्रदायातून उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी केली जात आहे.

त्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, माझे जुने व्हिडीओ व्हायरल केले जातात, मग हे लोक मधले 10 ते 15 वर्ष हे कुठे गेले होते?

माझ्यासाठी माझा पक्ष महत्त्वाचा आहे. मला पक्षासाठी काम करायचं असेल तर मी कुठूनही करू शकते. मी जर पक्षाबाहेरून काम केलं तर भाजपसाठी पळता भुई थोडी करेन….

स्वयंघोषित कीर्तनकार भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मागणार आहेत का? मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा मागणार आहेत का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय.

कर्नाटक सीमाप्रश्नावर बोलताना सुषमा अंधारे यांनी शिंदे सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, बोम्मईनी जशी कर्नाटकची बाजू लावून धरली तशी आमच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची बाजू का लावून धरली नाही,? उद्योग गुजरातला, गावं कर्नाटकला आणि महाराष्ट्राची जनता बसली वरती बघत.. अशा शब्दात त्यांनी सरकारला धारेवर धरलं.