Sushma Andhare: जाहीर सभांमध्ये उद्धव ठाकरेंचा बाप काढणाऱ्या सुषमा अंधारे शिवसेनेत प्रवेश करणार; शिवसेनेला मिळणार आंबेडकरी चळवळीचा चेहरा

| Updated on: Jul 27, 2022 | 6:08 PM

2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभा गाजवल्या होत्या. राष्ट्रवादीच्या त्या स्टार प्रचारक होत्या. जितेंद्र आव्हाडांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली होती. या सभेत त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर अत्यंत गंभीर टीका केली होती. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

Sushma Andhare: जाहीर सभांमध्ये उद्धव ठाकरेंचा बाप काढणाऱ्या सुषमा अंधारे शिवसेनेत प्रवेश करणार; शिवसेनेला मिळणार आंबेडकरी चळवळीचा चेहरा
Follow us on

मुंबई : फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वक्त्या प्रा. सुषमाताई अंधारे(Sushma Andhare) या शिवसेनेत( Shiv Sena) जाहीर प्रवेश करणार आहेत. यामुळे सुषमाताई अंधारे यांच्या माध्यमातून शिवसेनेला आंबेडकरी चळवळीतला नवा चेहरा मिळणार आहे. शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले(ramdas athawale) भाजप सोबत गेले. मात्र, आता पुन्हा एकदा सुषमाताई अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिक शक्ती – भिम शक्ती असा नारा ऐकायला मिळणार आहे. सुषमाताई अंधारे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या घोषणेनंतर त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray ) विरोधात केलेली भाषणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. या भाषणांमध्ये सुषमाताई अंधारे यांनी जाहीर सभांमध्ये उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर टीका केल्या आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या प्रचार सभांमध्ये सुषमाताई अंधारे यांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवरही सातत्याने निशाणा साधला होता.

अडचणीच्या काळात शिवसेनेच्या पाठीशी उभं राहण्याचा सुषमा अंधारे यांचा निर्णय

सुषमा अंधारे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 28 जुलै रोजी दुपारी 12 वाजता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अडचणीच्या काळात शिवसेनेच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय मी घेतला असून यासाठी मी शिवसेनेत जाहीर प्रवेश करत असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगीतले.

सुषमा अंधारेंनी गाजवल्या होत्या राष्ट्रवादीच्या सभा

2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभा गाजवल्या होत्या. राष्ट्रवादीच्या त्या स्टार प्रचारक होत्या. जितेंद्र आव्हाडांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली होती. या सभेत त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर अत्यंत गंभीर टीका केली होती. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

कोण आहेत सुषमा अंधारे

  1. सुषमा अंधारे यांचा जन्म उस्मानाबाद मधील कळंब तालुक्यात झाला.
  2. एम.ए., बी.एड.,पीएचडी.,लॉ अशा अनेक पदव्या त्यांनी मिळवल्या आहेत.
  3. सुषम अंधारे या वकील असून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या देखील आहेत.
  4. सुषमा अंधारे या उत्तम वक्त्या आणि लेखिका देखील आहेत
  5. आक्रमक भाषण शैलीसाठी त्या प्रसिद्ध आहेत.
  6. पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील त्या सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या आहेत.

शिवसेनेला आंबेडकरी चळवळीतला नवा चेहरा मिळणार

शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे सुषमाताई अंधारे यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला आंबेडकरी चळवळीतला नवा चेहरा मिळणार आहे. सुषमाताई अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आता पुन्हा एकदा सुषमाताई अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिक शक्ती – भिम शक्ती असा नारा ऐकायला मिळणार आहे.