अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांना आज न्यायालयाने एका प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. भुयार यांना 3 महिन्याचा तुरुंगवास आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी पंचायत समिती सदस्य असताना 2013 साली शेतकऱ्यांच्या ज्वारी संदर्भात तीव्र आंदोलन केलं होतं. त्यावेळी दाखल गुन्ह्यात भुयार यांना कलम 353 अंतर्गत अमरावती जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. भुयार यांनी त्यावेळी तत्कालीन तहसीलदार राम लंके यांच्या विरोधात वरुड तहसील कार्यालयावर आंदोलन केलं होतं. (MLA Devendra Bhuyar sentenced to 3 months imprisonment)
घटनेच्या दिवशी सुवर्ण जयंती राजस्व अभियान याची यशोगाथा तयार करत असताना देवेंद्र भुयार हे काही लोकांना घेऊन सभागृहात आले आणि तावातावाने बोलू लागले की, घटनेच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र उशिरापर्यंत का बंद आहे व तुम्ही माझा फोन का काटला? असा प्रश्न विचारला. तसंच तत्कालीन तहसीलदार यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि मारण्याची धमकी दिल्याचा आरोप देवेंद्र भुयार यांच्यावर करण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी आमदार देवेंद्र भुयार यांच्या एका पोस्टवरुन चांगलाच वाद रंगला होता. बकरी ईदच्या शुभेच्छा पोस्टमध्ये आमदार भुयार यांनी गाईचे फोटो टाकले असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. भुयार यांच्या या कृतीचा निषेध म्हणून वरुडमधील त्यांच्या कार्यालयावर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि भाजपने मोर्चा काढत भुयार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.
इतर बातम्या :
Video : चुकीला माफी नाही, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्याच्या पाठीवर दणका! नेमकं कारण काय?
18 वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधार-पॅनकार्ड, शाळा-महाविद्यालयाचे ओळखपत्र आवश्यक
MLA Devendra Bhuyar sentenced to 3 months imprisonment