ईडीच्या हजेरी आधी एकनाथ खडसेंना कोरोनाची लक्षणे?

| Updated on: Dec 30, 2020 | 7:24 AM

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याची माहिती कळतीय.

ईडीच्या हजेरी आधी एकनाथ खडसेंना कोरोनाची लक्षणे?
एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

मुंबई :  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याची माहिती कळतीय. गेल्या दोन दिवसांपासून खडसे मुंबईतल्या निवासस्थानी आहेत. लक्षणे जाणवत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी घरीच थांबणं पसंत केलं. खडसेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत. (Symptoms of corona to NCp Leader Eknath Khadse)

जळगावात असताना खडसेंना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागली. लक्षणे जाणवताच त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रयाण केले. मुंबईतल्या निवासस्थानी सोमवारी आणि मंगळवारी खडसेंनी आराम केला. दोन दिवसांपासून खडसे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत वा कुणाच्याही संपर्कात नाही. अशात खडसेंनी कोरोनाची चाचणी केलेली आहे, अद्याप रिपोर्ट येणं बाकी असल्याची माहिती कळतीये. आज रिपोर्ट येण्याचीही शक्यता आहे.

याअगोदर एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अगदी काही दिवसांत त्यांना कोरोनाचा धोका पोहोचला होता. 19 ऑक्टोबर रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पुढच्या काही दिवसांत त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती.

दुसरीकडे अगदी काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने अर्थात ईडीने नोटीस बजावलेली आहे. ईडीकडे हजेरी लावण्यासाठी खडसेंनी वेळ मागून घेतली होती. ईडीकडे हजेरी लावण्यापूर्वी खडसेंना कोरोनाची लक्षणे जाणवत आहे.

खडसेंबरोबर त्यांची मुलगी राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. खडसे बाप-लेकीने मुंबईतल्या एका खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेतले होते. उपचारानंतर त्यांची प्रकृती ठणठणीत झाली होती. मात्र दीड-ते दोन महिन्यांच्या अंतराने खडसेंना पुन्हा एकदा कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने खडसे परिवाराची चिंता वाढली आहे. (Symptoms of corona to NCp Leader Eknath Khadse)

संबंधित बातम्या

एकनाथ खडसे यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, रुग्णालयातून डिस्चार्ज

एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे कोरोना पॉझिटिव्ह, खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल