Uddhav Thackeray | माझ्या पाठीत वार करा, मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका, ‘आरे’वरून उद्धव ठाकरेंचं आवाहन

| Updated on: Jul 01, 2022 | 2:41 PM

'आरे' प्रोजेक्टसाठी एका रात्रीत झाडांची कत्तल झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्री होताच या निर्णयाला स्थगिती दिली होती. असे असतानाही मुंबईच्या विकासाच्या आडवे न येता त्यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आला होता. कांजूल मार्ग होता त्याचा पर्याय उपलब्ध होता.

Uddhav Thackeray | माझ्या पाठीत वार करा, मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका, आरेवरून उद्धव ठाकरेंचं आवाहन
शिवसेने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : नवनिर्वाचित मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाहीत. माझ्या पाठीत वार करुन झालेला मुख्यमंत्री हा शिवसैनिक होऊ शकत नाही. पदासाठी केलेला घात हा ठिक आहे. पण आरे सारख्या प्रोजेक्टबाबतचा निर्णय बदलून सराकारने मुंबईच्या काळाजात कट्यार घुसवल्याची खंत (Uddhav Thackeray) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. नव्या (State Government) सरकारच्या स्थापनेनंतर त्यांनी प्रथमच शिवसेना भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. शिवाय नव्या सराकारवर त्यांनी टीका करीत नव्याने घेतलेल्या निर्णयाने (Mumbai) मुंबईचे कसे नुकसान केले जात आहे हे पटवून सांगितले. माझ्या पाठीत वार करा म्हणत त्यांनी बंडखोर आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका तर केलीच पण मुंबईच्या हिताचे निर्णय घेतले त्याविरोधात पावले उचलली जात असल्याचेही निदर्शनास आणून दिले आहे. मेट्रोमध्ये आरेचा भाग घेऊ नका असे आवाहानच त्यांनी केले आहे.

पर्यावरण संवर्धनामुळे घेतला होता निर्णय

‘आरे’ प्रोजेक्टसाठी एका रात्रीत झाडांची कत्तल झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्री होताच या निर्णयाला स्थगिती दिली होती. असे असतानाही मुंबईच्या विकासाच्या आडवे न येता त्यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आला होता. कांजूल मार्ग होता त्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र, यामध्ये मतमतांतर असू शकते. त्यामुळे सरकारला जे योग्य वाटेल तो निर्णय घेतला जाईल पण अपेक्षा एवढीच आहे की, मुंबईच्या हिताचे निर्णय व्हावेत. पर्यावरण संवर्धनाच्या अनुशंगाने घेतलेल्या निर्णयात आता बदल केला जात आहे.

उद्धव ठाकरे यांची हात जोडून विनंती

मुख्यमंत्री पदावरुन पाय उतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिलीच पत्रकार परिषद घेऊन सरकारबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे. माझ्याशी वैर असू शकते. ते गेल्या काही दिवसांपासून लपून राहिलेले नाही. माझ्या पाठीत वार केला तरी चालेल पण मुंबईच्या काळजात कट्यार घुसदू नका असे आवाहनच त्यांनी सरकारला केले आहे. सरकारची स्थापना होताच आरे बाबत घेतलेल्या निर्णयावरुन त्यांनी हे आवाहन केले आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईच्या पर्यावरणाची खेळू नका

राजकारणातील सुडाची भावना वेगळी पण आतापर्यंत मुंबईच्या हितासाठी आणि येथील पर्यावरणाच्या दृष्टीनेच आरे बाबतचा निर्णय घेतला होता. आता सरकारमध्ये बदल होताच या प्रोजेक्टमध्येही बदल पाहवयास मिळणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर वार करा पण मुंबईती पर्यावरणाचा ऱ्हास करु नका असे सांगितले आहे. जो प्रस्ताव दिला आहे त्यावरच निर्णय घ्यावा असे आवाहन मुंबईकरांच्या माध्यमातून करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.