पुणे : पुण्यातील (Pune) ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) घडलेला प्रसंग एका वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा सुरु आहे. आरोग्यमंत्री ससून रुग्णालयात हाफकिन माणसाकडून औषधं घ्यायचा बंद करा असा आदेश दिला. त्यावेळी त्यांच्या पीएकडून त्यांना हाफकिन ही संस्था असल्याचे सांगितले. मंत्र्यांनी तिथून पळ काढला अशी अशी बातमी छापून आली आहे. त्यावर आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. छापून आलेली बातमी सोशल मीडियावर चांगली व्हायरल झाल्याने सावंत (Tanaji Sawant) यांच्यावरती टीका होत आहे.
“मी मुर्ख आहे का ? मी डॉक्टर आहे. मी पिएचडी होल्डर आहे तसेच रॅकर आहे. आयुष्यभर घासलेलं आहे. मीडिया मुद्दाम टार्गेट करुन दाखवत आहे. जनतेची दिशाभूल केली जात आहे” असं तानाजी सावंत यांनी सांगितलं.
हापकिन कोण आहेत हे मला माहिती नसल्याचे मीडियाने दाखवले. मी ग्रामीण भागातील आहे. मी जर एखादी गोष्ट ग्रामीण भागातील म्हणालो, तर मीडिया माझ्या मागे फिरणार नाही. विशेष म्हणजे अशा गोष्टींसाठी पेनाला टोपन लावत आहेत.
जनतेच्या मनातले हे सरकार आणले आहे. हे टाकाऊ सरकार नाही. मिडीयाने टीका करायची आणी आम्ही ऐकायचं असं होणार नाही. यापुढे आमच्या कामातून सडेतोड उत्तर मिळतील.
राज्यात सत्तांतर झाल्याची पोटतिडकी मीडियाला का आहे ? दसरा मेळाव्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारा. मी आरोग्य मंत्री झाल्यानंतर झालेला बदल येत्या काही दिवसात तुम्हाला दिसुन येईल. सध्या प्रत्येक रुग्णालयात कामकाज पाहत व्यथा जाणून घेत आहे. राज्यभरात वैद्यकिय क्षेत्रात असलेले अनेक प्रलंबित प्रश्न एका महिन्यांच्या आत मार्गी लावणार असल्याचं आश्वासनं त्यांनी दिलं.