मुंबई : महायुती आणि आघाडीमध्ये अजून जागावाटप झालेलं नाही. पण महायुतीचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयने स्वतःचा उमेदवारही जवळपास जाहीर केलाय. कारण, आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले (Suman Patil Seema Athavle) यांनी तासगावातून लढवण्याची तयारी दाखवली आहे. सीमा आठवले निवडणूक लढल्यास त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील (Suman Patil Seema Athavle) यांच्याशी होईल.
तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघातून आपण इच्छुक असल्याचं सीमा आठवले यांनी महिला मेळाव्यात बोलताना म्हटलंय. हा मतदारसंघ आर. आर. पाटील यांचा बालेकिल्ला होता. त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत पत्नी सुमन पाटील यांनी विजय मिळवला. यावेळीही राष्ट्रवादीकडून तासगावातून सुमन पाटील यांनाच उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यामुळे तासगावची जागा कुणाला सुटते तो प्रश्न आहेच, शिवाय त्यात ही जागा आरपीआयला हवी असेल तर त्यासाठी ओढाताण नक्कीच होणार आहे. कारण, तासगावात शिवसेना आणि भाजपातही इच्छुकांची संख्या मोठी आहे.
VIDEO :