नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुनावणी झाली. या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुरुवातीला युक्तिवाद केला. त्यानंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी जोरदार युक्तिवाद केला. कपिल सिब्बल यांच्यानंतर ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनीही युक्तिवाद केला. आमदार पक्षाच्या एबी फॉर्मवर निवडून आले आहेत. नंतर नियम का लागू नाही?, असा सवाल देवदत्त कामत (Devdutt Kamat) यांनी केला. त्यानंतर महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) आणि देवदत्त कामत यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. निवडणूक आयोगाच्या समोरच हा वाद झाल्याची माहिती मिळते.
कामत यांच्या युक्तिवादावर जेठमलानी यांनी आक्षेप घेतला. प्रतिनिधी सभा फक्त तुमचीच कशी असू शकते, असा सवाल महेश जेठमलानी यांनी विचारला आहे. कामत यांचा युक्तिवाद सुरू असताना जेठमलानी यांनी हा आक्षेप घेतला आहे. प्रतिनिधी सभा ही शिंदे गटाचीसुद्धा असू शकते, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला.
शिंदे गटानं प्रतिनिधी सभा घेतल्यास ती बेकायदेशीर आहे. असा युक्तिवाद कामत यांनी केला होता. प्रतिनिधी सभा निर्णय घेऊ शकते. त्यामुळं प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी द्या, अशी विनंती कामत यांनी निवडणूक आयोगाला केली होती.
दोघांनी वाद केल्यानंतर निवडणूक आयुक्तांनी मध्यस्थी केल्याची माहिती आहे. मुख्य नेतेपद हेच बेकायदेशीर असल्याचंही कामत यांनी म्हंटलं होतं.
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी कशी बनविली, असा सवालही महेश जेठमलानी केला केला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणं म्हणजे मतदारांना सोडून देणं होय. युतीचं आश्वासन देऊन मतं मिळवली. नंतर मतदारांना सोडून दिलं, असा युक्तिवादही जेठमलानी यांच्याकडून केला जाऊ शकतो.