मुंबई : महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी समोर (sunil raut may resign) आली आहे. अॅड अनिल परब, उदय सामंत, अब्दुल सत्तार यांच्यासह 13 जण मंत्रिपदाची शपथ (Shivsena Minister List) घेणार आहेत. मात्र शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू आमदार सुनील राऊत राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली (sunil raut may resign) जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील राऊत हे सध्या अज्ञातस्थळी आहेत. त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे उद्या (31 डिसेंबर) ते आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांना सुपूर्द करणार असल्याचेही बोललं जात आहे. सुनील राऊत हे विक्रोळी मतदारसंघाचे आमदार आहेत
माझ्यावर अन्याय झाला अशी प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी काही वेळापूर्वी दिली होती. त्यामुळे ते नाराज असल्याचे बोललं जात होतं. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिवसेनेत राजकीय नाट्य सुरु झालं (sunil raut may resign) आहे.
गेल्या महिन्याभरातील राजकीय सत्तानाट्यामध्ये संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती.
तानाजी सावंतही नाराज?
इतकंच नव्हे तर परांडा मतदारसंघाचे शिवसेना आमदार तानाजी सावंतही नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. तानाजी सावंत गेल्या काही वेळापासून मातोश्रीवर ठाण मांडून बसले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ते आले आहेत. त्यामुळे एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार आणि दुसरीकडे शिवसेना नेत्यांची नाराजी हे राजकीय नाट्य सुरु झाल्याचे (sunil raut may resign) पाहायला मिळत आहे.
मात्र मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या सर्व मंत्र्यांची यादीनुसार केवळ 36 नेते शपथ घेणार आहेत. त्यात अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार (Thackeray Government Minister Full List) आहेत. यामध्ये सुनील राऊत यांचे नाव कुठेही नाही.
शिवसेनेचे मंत्री
संजय राठोड
गुलाबराव पाटील
दादा भुसे
संदीपान भुमरे
अनिल परब
उदय सामंत
शंकरराव गडाख
आदित्य ठाकरे
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री)
शंभराजे देसाई (राज्यमंत्री)
बच्चू कडू (राज्यमंत्री)
राजेंद्र येड्रावकर (राज्यमंत्री)
आतापर्यंत सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.