मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या काही मंत्र्यांनीही स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या मंत्र्यांनी ही तातडीची पावले उचलली आहेत. (Thackeray Government Ministers Self Quarantine as Dhananjay Munde tests COVID Positive)
10 जून रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आले होते. वर्धापन दिन आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क आल्याने ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे.
मुंबईत मंत्रालयाच्या समोर असलेल्या मंत्र्यांच्या बंगला परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या बंगला परिसरातील कर्मचारी वस्ती असलेल्या भागातही कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये मुंडेंच्या स्वयंपाकी, मदतनीस यांचा समावेश आहे. धनंजय मुंडे यांच्यासह सर्वांवर सध्या उपचार सुरु आहेत.
हेही वाचा : Dhananjay Munde | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण
धनंजय मुंडे हे बीडमधील परळीचे आमदार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते आमदारपदी निवडून आले. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्या खांद्यावर सामाजिक न्याय मंत्रिपदाची धुरा देण्यात आली.
ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. याआधी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने या दोन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली. (Thackeray Government Ministers Self Quarantine as Dhananjay Munde tests COVID Positive)
VIDEO : Corona Breaking | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण https://t.co/xdlxaAV6ZE
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2020
संबंधित बातम्या :
मिरा भाईंदरमध्ये शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू
ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू, आव्हाडांकडून हळहळ व्यक्त
किमान 12 तास रस्तेमार्गे प्रवास, अशोक चव्हाणांवर मुंबईत कोरोनावर उपचार!
(Thackeray Government Ministers Self Quarantine as Dhananjay Munde tests COVID Positive)