ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या, मशाल चिन्हावर अक्षेप घेत समता पार्टीची निवडणूक आयोगाकडे धाव

| Updated on: Oct 12, 2022 | 1:37 PM

निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला देण्यात आलेल्या मशाल या चिन्हावर बिहारमधील समता पार्टीने अक्षेप घेतला आहे. पार्टीचा कार्यकर्ता निवडणूक आयोगाकडे दाखल झाला आहे.

ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या, मशाल चिन्हावर अक्षेप घेत समता पार्टीची निवडणूक आयोगाकडे धाव
Follow us on

मुंबई :  ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. धनुष्यबाण या चिन्हावर शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोघांनीही दावा केल्यामुळे निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. तसंच पुढील आदेश येईपर्यंत शिवसेना (Shiv sena) हे नाव देखील वापरता येणार नाहीये. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून (Election Commission) शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव तर ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर ठाकरे गटला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तर मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. मात्र आता ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल या चिन्हावरच बिहारमधील समता पार्टीने अक्षेप घेतला आहे. हे चिन्हा आमचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

समता पार्टीची निवडणूक आयोगाकडे धाव

निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला देण्यात आलेल्या मशाल या चिन्हावर बिहारमधील समता पार्टीने अक्षेप घेतला आहे. या चिन्हावर त्यांनी देखील दावा केला आहे. समता पार्टीचा कार्यकर्ता निवडणूक आयोगाकडे दाखल झाला आहे. कैलास झा असं या कार्यकर्त्याचे नाव आहे. कैलास झा  हे समता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे पत्र घेऊन निवडणूक आयोगाकडे गेले आहेत.  समता पर्टीने मशाल या चिन्हावर दावा केल्यामुळे आता शिवसेनेच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

निवडणूक आयोगाविरोधात शिवसेना न्यायालयात

दरम्यान दुसरीकडे चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी या याचिकेत शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.