मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथविधीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं (Jitendra awhad on ashish shelar) आहे. “मुख्यमंत्र्यांविरोधात जर तुम्ही सुप्रीम कोर्टात गेला जर याच्यावर एकाही कोर्टाने वेडावाकडा निकाल दिला. तर मी माझा राजीनामा चंद्रकांत पाटील यांच्या हातात देईन” असे जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad on ashish shelar) म्हणाले.
“तुम्हाला रात्री 1.30 वाजता कॅबिनेट चालते, सकाळी पहाटे 4 वाजता राष्ट्रपती राजवट उठवलेली चालते. 6.30 ला शपथ चालते. तुम्हाला ज्या सुप्रीम कोर्टात जा, जर याच्यावर एकाही कोर्टाने वेडावाकडा निकाल दिला. तर माझा राजीनामा मी चंद्रकांत पाटीलांच्या हातात देईन. त्यांनी जाऊन राज्यपाल आणि अध्यक्षांना द्यावा. जर असं झालं नाही तर त्यांनी द्यावा” असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“मुख्यमंत्री दोन्ही सभागृहाचे सदस्य नाहीत ते मुख्यमंत्री कसे होतात असे चंद्रकांत पाटील म्हणतात. त्यांना मला विचाराव वाटत की ते संविधान वाचतात की नाही. संविधानाची एक प्रत भेट देऊ का?” असा प्रश्नही त्यांनी विचारला.
“मुख्यमंत्र्यांची आशा ठेवून काम करणारे, सतत देवेंद्र फडणवीसांना पाण्यात पाहणारे, एवढं ज्ञान, व्हा रे व्हा,” अशी खोचक टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra awhad on ashish shelar) केली.
इतकंच नव्हे तर भाजप नेते आशिष शेलार यांच्या ट्विटलाही जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. “आशिष शेलार यांना कवी म्हणून ठेऊ. त्यांना पुढील पाच वर्षे कवी व्हायचं आहे. शब्द ओढून ताणून काय तरी शब्द जुळवायचे आणि कवी व्हायचं, चांगल आहे. पुढील पाच वर्षे कवीच व्हायचं त्यांना दुसरं काम त्यांना काय आहे.”
“आम्हीही पाच वर्षे सत्तेच्या बाहेर गेलो. सत्तेच्या बाहेर येणं जाणे हे लोकशाही आणि संविधानामुळे जनतेचा अधिकार आहे. तुम्हाला 122 वरुन 105 वर आणलं. तेव्हाच तुम्ही समजायला हवं होतं की जनतेच्या मनात काय आहे. आता ज्या पद्धतीने तुम्ही गेले 15 दिवस वागलात अजून जनतेच्या डोळ्यातून मनातून उतरलात.” असेही जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad on ashish shelar) म्हणाले.
“चंद्रकांत पाटील यांना सुप्रीम कोर्टात नाही. तर इंटरनॅशनल हेगच्या कोर्टात जाऊ द्या. जर त्यांना 180 दिवस मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहू शकतात हा निकाल दिला नाही. तर मी काहीही हरेन. त्यांच्या मंत्रिमंडळात सावंत नावाचे मंत्री होते. ते दोन्ही सभागृहाचे सदस्य होते का? याची आठवणही चंद्रकांत पाटील यांना करुन द्या” असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.