ठाणे | 16 ऑगस्ट 2023 : विजय वडेट्टीवार काय म्हणाले याच्यावरती मी स्पष्टीकरण द्यावं, हे हास्यास्पद होईल. पण शरद पवारांना कोण ऑफर देऊ शकतो हे म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा जोक आहे!, असं राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड म्हणालेत. त्यांची उंची किती. त्यांची लोकसभेतील कारकीर्द किती आणि त्यांना कोण ऑफर देणार, जे कोणी काय बोलतात ते बोलू देत. पवार साहेबांनी सांगोल्याच्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं आहे की मी कुठेही जाणार नाही. मी जातीयवादी पक्षाची हात मिळवणार नाही. मी पुरोगामी विचारांचा पुरस्कार करता आहे. मी तेच विचार पुढे घेऊन जाणार आहे, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार शरद पवार भेटीवर भाष्य केलं. शरद पवार हे सोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री करू अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अट असावी. त्यामुळेच अजित पवार शरद पवार यांची भेट घेत असावेत, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत. त्याला जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादीच्या मागेपुढे संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करणं, हेच एक उद्दिष्ट आहे. बोलणाऱ्यांचं शरद पवार कोणाच्या ऐकायला बसलेत का तुमच्या घरात राजकारण सुरुवातीपासून चालत आलेला आहे ,त्यामुळे त्यांच्या विचारधारेत फरक पडलेला नाही. ते पुरोगामी विचार घेऊनच चाललेत यापुढे पुरोगामी विचार घेऊनच चालतील, असा विश्वासही जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.
ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावरही जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा हॉस्पिटल सुधारावं. आमच्या चूका जर झाल्या असतील तर आम्ही हॉस्पिटल समोर जाऊन नाक घासून माफी मागायला तयार आहोत. पण 25 जणांचा मृत्यू झाला. त्यांच काय करायचं? ते ठरवा, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
रुग्णालयात काय काय कमी आहे ते बघा. उगाच आपल्यावरचा दोष दुसऱ्यांवरती ढकलण्याचा प्रयत्न करू नका. घटनेचा गांभीर्य असतं तर पाचव्या मिनिटाला तुम्ही तिथे आला असता. दोन दिवस तिथे कोणी आलं नाही. त्यामुळे उगाच आम्हाला बोलायला लावू नका, असं म्हणत आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.